Pune News: पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आणि संस्थापक मारुती नवले यांना मोठा दुसरा दणका बसला आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं सिंहगड इन्स्टिट्यूटवर मोठी कारवाई केली आहे. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूट संचलित इतरही काही शैक्षणिक संस्थांबाबत कठोर निर्णय घेतला आहे.
राज्याच्या तंत्रशिक्षण विभागानं सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील एकूण 25 संस्थांचं व्यवस्थापन आता राज्य सरकारनं स्वत:च्या ताब्यात घेतलं आहे. तसेच सरकारकडून सिंहगड इन्स्टिट्यूटनी संबंधित सात महाविद्यालयांवर तीन वर्षांसाठी प्रशासक म्हणून पुणे विभागाच्या तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीसह संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती नवले यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाकडून संस्थेतील आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडी,सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर आता 'सिंहगड' संचलित 7 महाविद्यालयांवर व्यवस्थापन उच्च शिक्षण संचालनालयानं तर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील 25 संस्थांचं व्यवस्थापन राज्य सरकारनं ताब्यात घेतलं आहे.
विशेष म्हणजे या सातही महाविद्यालयांवर पुढील 3 वर्षांसाठी प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. याचदरम्यान, तंत्रशिक्षण विभागानं सर्व संस्थांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी प्रशासकीय मंडळाची रचना केली आहे. तसेच प्रशासक राजचा निर्णय हा तातडीनं लागू करण्याबाबतचा आदेशही काढला आहे.
याअगोदर मुंबई उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 44 शैक्षणिक संस्थांमधील आर्थिक व्यवहार, विश्वस्तांची मालमत्ता आणि निधीच्या कथित गैरवापराची सीबीआय , ईडी आणि आयकर विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता नवी अपडेट समोर येत आहे.
पुण्यातील सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीकडून सुमारे 6,000 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे 40 महिन्यांचे वेतन न दिल्यानं आणि न्यायालयाला दिलेल्या हमीपत्राचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समोर येत आहे. मात्र, यापूर्वीच संस्थेची सर्व बँक खाती, गुंतवणूक आणि मालमत्तेची विक्री करण्यावर निर्बंध आणण्यात आले आहेत.
महत्वाची बाब म्हणजे राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाकडून इंजिनिअरिंग व इतर व्यावसायिक शिक्षणाशी संबंधित संस्थांवर प्रशासकीय मंडळ नियुक्त केले जाणार आहे. याबाबत शिक्षण संचालनालयाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी गुरुवारी(ता. 12 नोव्हेंबर) महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे.
सरकारने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीशी निगडित सात महाविद्यालयांवर प्रशासक नियुक्त केला आहे. त्यात आंबेगाव येथील सिंहगड कॉलेज ऑफ लॉ, कुसगाव-लोणावळामधील काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन, नऱ्हे सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, कुसगाव-लोणावळा निवृत्ती बाबाजी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, कोंढवा सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स, एरंडवणे काशीबाई नवले कॉलेज ऑफ कॉमर्स आणि आंबेगाव बु. सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स या 7 महाविद्यालयांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.