Harshvardhan Patil On Amit Shah : ...म्हणून हर्षवर्धन पाटलांचा सहकारमंत्री अमित शाहांवर कौतुकाचा वर्षाव!

BJP Political News : " शाह यांनी सहकार खात्यामध्ये धाडसी निर्णय घेतल्यामुळे..."
Amit Shah-Harshvardhan Patil
Amit Shah-Harshvardhan PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजकुमार थोरात

Walchandnagar News : देशाचे गृहमंत्री व पहिले सहकारमंत्री अमित शाहांच्या निर्णयाचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच कौतुक करत असतात. शाह यांनी सहकार खात्यामध्ये धाडसी निर्णय घेतल्यामुळे ३५ हजार कोटी रुपयांचा सहकारी साखर कारखान्यांचा व शेतकऱ्यांचा फायदा झाला असल्याची माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सहकार खात्याचा पदभार स्विकारल्यानंतर सहकारी साखर कारखान्यांचा इनकम टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला होता.सुरुवातीला ही रक्कम १० हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.मात्र, प्रत्यक्षात या रक्कमेचे व्याज व पॅनेलटीसह ३५ हजार कोटी रुपयांवर पोहचली होती.

Amit Shah-Harshvardhan Patil
Amit Shah On BJP MLA : भाजप खासदार, आमदारांना धडकी; कामगिरीवरच मिळणार तिकीट, काय म्हणाले अमित शाह?

यासंदर्भात हर्षवर्धन पाटील(Harshvardhan Patil) म्हणाले,अमित शाह यांच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फार मोठा फायदा झाला आहे.इनकम टॅक्स संदर्भात नोटीस कारखान्याना असून कारखान्याचा इनकम टॅक्स माफ करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्यामध्ये असून अमित शाहांमुळे १० हजार कोटी रुपये नव्हते तर ३५ हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांचा व सहकारी साखर कारखान्यांचा फायदा झाला आहे.साखर उद्योगाला या निर्णयामुळे भरारी मिळाली आहे.(Sugar Factory)

तसेच राज्यातील ६८ सहकारी साखर कारखान्यांनी शुगर डेव्हलपमेंट फंडातून ५५०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यांच्यावरती व्याज,पॅनेलटी माफ करुन कर्जाचे रिस्ट्रक्चर करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.याची बैठक १८ सप्टेंबर रोजी होणार असून तो ही निर्णय लवकरच होईल अशी अपेक्षा आहे.

युक्रेन-रशिया तसेच इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा परिणाम क्रुड ऑईलवरती होण्याची शक्यता असून भविष्यात तेलाचा गंभीर विषय होऊ शकतो.साखर उद्योगाला भरारी देण्यासाठी इथेनॉलचे दर वाढविण्याची गरज आहे.सध्या इथेनॉलचे दर ५७.८५ रुपये ते ६३.८५ रुपये प्रतिलिटर आहेत.यामध्ये ७ ते ८ रुपये प्रतिलिटर वाढविण्याची गरज असून यामुळे शेतकऱ्यांचा निश्‍चित फायदा होईल.

तसेच शासनाने उसाच्या एफआरपीचे ३५० ते ४०० रुपये प्रतिटन आत्तापर्यंत दर वाढवले आहेत. चालू वर्षी साखरेचे दर वाढू लागले आहेत.साखरेची किमान आधारभूत किंमत (एमएसपी)३१०० रुपये प्रतिक्विंटल आहे.मात्र, जास्त दराने विक्री होत आहे.

Amit Shah-Harshvardhan Patil
Sharad Pawar & Ajit Pawar : चंद्रपुरात शरद पवार गटाला मोठा धक्का;अनेक तालुकाध्यक्षांचा अजित पवार गटात प्रवेश

साखरेची एमएसपी ३६०० रुपये प्रतिक्विंटल केल्यास साखर कारखान्यांना खेळते भांडवल उपलब्ध होईल.याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून शेतकऱ्यांना लवकर उसाचे पैसे देणे शक्य होईल. चालू वर्षीच्या गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी राज्य सहकारी साखर संघामार्फत मंत्री समितीची बैठक लवकरच मुख्यमंत्री यांनी घ्यावी असा प्रस्ताव दिला आहे.चालू वर्षीचा गाळप हंगाम कमी कालावधीसाठी असेल असेही पाटील यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Amit Shah-Harshvardhan Patil
Karad Gopichand Padalkar News : धनगर समाजाचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ बिहार, तेलंगणा, मध्य प्रदेशला जाणार : पडळकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.