MLC Election : 'राष्ट्रवादी'मध्ये मोठ्या घडामोडी, सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले; काकडेंच्या उमेदवारीवर नाराज? म्हणाले,...

Sunil Tingre NCP Meeting : सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून बाहेर पडले. विधान परिषदेसाठी ते इच्छुक होते. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
Sunil Tingre
Sunil TingreSarkarnama
Published on
Updated on

NCP MLC Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात जिजाई बंगाल्यात बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे मोठे नेते देखील उपस्थित आहेत. विक्रम काकडे यांच्या उमेदवारीबाबत पक्षात नाराजी असल्याची चर्चा असताना माजी आमदार सुनील टिंगरे हे बैठकीतून बाहेर पडले.

टिंगरे हे देखील राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमदेवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते. बैठकीतून बाहेर पडून जात असताना पत्रकारांनी त्यांना घेरले. तेव्हा त्यांनी सांगितले की, अजून नाव निश्चित झाले नाही. मी नाराज नाही. मी पुढील तयारी करण्यासाठी पार्टी ऑफसला चाललो आहे. पक्षश्रेष्ठी व्यवस्थीत निर्णय घेत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष असलेले रामदास गाडे यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांना पाठवला आहे. काकडेंच्या उमेदवारीवर त्यात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Sunil Tingre
Sangram Jagtap NCP : महायुतीतच धुसफूस; राष्ट्रवादीच्या हातातली जागा गेली, दिग्गज भाजपसमोर जगताप समर्थकांची नाराजी कितपत टिकणार?

राजीनाम्यात म्हटले आहे की, आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या चुकीच्या उमेदवाराची घोषणा आज झाली . संजय काकडेनी पक्ष फोडला पक्षाचे दोन दोन टर्मचे नगरसेवक फोडून भारतीय जनता पार्टीत नेले त्यांना रसद पुरवली व अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसला व देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले अशा संजय काकडे च्या मुलाला जर पक्ष तिकीट देत असेल तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षात काय किंमत राहणार आहे त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे

दरम्यान, दरम्यान, जिजाई बंगाल्यावर माजी खासदार संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की, ज्यांनी अजितदादांसोबत काम केले त्यांना उमदेवारी दिली पाहिजे होती. मात्र, जे पक्ष सोडून गेले आणि भाजपला मदत केली त्यांना उमेदवारी देत निष्ठवंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.

Sunil Tingre
Sachin Jagtap Or Prajakt Tanpure : 'मविआ'चा काळ आठवा, तनपुरेंना संधी, जगतापांना डावललं; विधान परिषद उमेदवारीवरून खदखद, राष्ट्रवादी नेत्यांचा सूचक इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com