women fraud case: सुषमा अंधारेंचा महिलांच्या फसवणूक प्रकरणी गंभीर आरोप; आयोग दखल घेत नसल्याची केली तक्रार

commission neglect complaint News : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रयकार परिषद घेत पुण्यातील नांदेड सिटीमधील एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
 Sushma Andhare
Sushma Andharesarkarnama
Published on
Updated on

Pune News : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आणखी एक नवे प्रकरण उघडकीस आणले आहे. एकीकडे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी पत्रयकार परिषद घेत पुण्यातील नांदेड सिटीमधील एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या सर्व प्रकरणानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील नांदेड सिटीमधील एका मोठ्या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यांनी बिल्डर विक्रम चाकणकर याच्यावर अनेक लोकांकडून, विशेषतः महिलांकडून, 70 ते 80 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला.

 Sushma Andhare
BJP Vs Shivsena : बोर्ड फाडले, लाथा घातल्या, कानाखाली मारल्या... वरळीच्या 5 स्टार हॉटेलमध्ये भाजप-ठाकरेंच्या सेनेत तुफान राडा

रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून चाकणकरने करोडो रुपये उकळले, मात्र ना गुंतवणूक परत मिळाली ना फ्लॅट मिळाले. पीडितांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप अंधारे यांनी केला. यावेळी त्यांनी वर्षा दमिष्टे, शीतल शिंदे आणि सचिन सुर्वे या तीन पीडित व्यक्तींना समोर आणत त्यांची व्यथा मांडली.

 Sushma Andhare
Nagpur NCP : आता उमेदवारांनी स्ट्रॉंगरुम समोर झोपायचे का? सुरक्षा धोक्यात, पवारांच्या राष्ट्रवादीची तक्रार

या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, पीडितांना न्याय मिळण्याऐवजी, नांदेड सिटी पोलिसांनी चाकणकर आडनाव ऐकताच हस्तक्षेप करून पीडित महिलांवरच सावकारकीचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. महिला आयोगही पीडितांना मदत करण्याऐवजी, उलट त्यांच्यावरच खोट्या केसेस टाकण्यासाठी पुढे येत असल्याचा गंभीर आरोप अंधारे यांनी केला आहे.

 Sushma Andhare
BJP Vs Congress : बावनकुळेंनी काँग्रेसमधला जीवच काढून घेतला... मुलालाही केलं सक्रिय : 'घराच्या' मैदानाची पद्धतशीर मशागत

या प्रकरणात रूपाली निलेश चाकणकर यांच्या पदाचा गैरवापर करून हे घडत असल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणात पोलिसाकडून काय कारवाई केली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

 Sushma Andhare
Shivsena UBT : खैरेंच्या विरोधानंतरही दानवे माजी आमदाराला घेऊन ठाकरेंच्या भेटीला : मातोश्रीवर काय घडले? सांगितली Inside Story

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com