Devendra Fadnavis Latest News : कावळा बसला,फांदी मोडल्याने वीज जात असल्याचा 'महावितरण'चा दावा फडणवीसांनीच खोडला

Monsoon Session News : पिंपरी महापालिका आणि मेट्रोचे खोदकाम यामुळे उद्योगनगरीतील वीज ३९ वेळा गेली होती..
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pimpri Chinchwad : राज्य विधीमंडळाच्या सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात भोसरीचे पैलवान आमदार महेश लांडगे यांची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यांना कचरा करमाफीच्या लक्षवेधीसाठी खूप प्रतीक्षा करावी लागल्याने गेल्या सोमवारी ते विधानसभेत प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी त्याच आवेशात उद्योगनगरीला भेडसावणारा विजेचा प्रश्न सभागृहात दुसऱ्या लक्षवेधीव्दारे मांडला.

उपमुख्य़मंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी त्यांच्या लक्षवेधीतील व नंतरच्या भाषणातील जवळजवळ सर्वच मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना वारंवार वीज पुरवठा खंडित जात असल्याने त्याबद्दल विचारणा करणाऱ्या ग्राहकांना महावितरणचे इंजिनिअर अधिकारी हे विजेच्या तारेवर कावळा बसला,त्यावर फांदी पडली अशी न पटणारी उत्तरे देत होते, असे आमदार लांडगे यांनी सभागृहात सांगितले.

Devendra Fadnavis News
Rahul Kul On Sanjay Raut : 'क्लिन चिट'नंतर कुल यांनी राऊतांना डिवचलं; म्हणाले, "लोकांनी मला दोनदा..."

त्यांचा हा दावा खुद्द ऊर्जामंत्र्यांनीच खोडून काढला. पिंपरी महापालिका आणि मेट्रोचे खोदकाम यामुळे उद्योगनगरीतील वीज ३९ वेळा गेली होती, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या उत्तराने महावितरणचे अधिकारी उघडे पडले आहेत.

आमदार महेश लांडगें(Mahesh Landge) च्या भोसरी मतदारसंघासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात वीजेचा मोठा प्रश्न आहे. वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. मार्च महिन्यात,तर दीड दिवस वीज गायब झाल्याने भोसरीकरांचे मोठे हाल झाले होते. त्यावर महावितरणच्या भोसरी विभागीय कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांची आ. लांडगे यांनी खरडपट्टी काढली होती.

Devendra Fadnavis News
No Confidence Motion : मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; अग्निपरीक्षा शिवसेना- राष्ट्रवादीची ! 'व्हिप'चा मुद्दा कळीचा ठरणार

त्यानंतरही फारसा फरक न पडल्याने त्यांनी याप्रश्नी लक्षवेधी दिली होती. ती आज पटलावर आली. त्यावर बोलताना पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad)सारख्या औद्योगिक शहरात २४-२४ तास वीजपुरवठा खंडीत झाला, तर नागरिकांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागते,याकडे त्यांनी लक्ष वेधले.त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या.

महावितरणच्या भोसरी उपविभागाचे विभाजन करण्यात येणार असून तेथे आणखी तीन उच्चदाब उपकेंद्र उभारली जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. `महावितरण`च्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.