Marathi Sahitya sammelan : ९७ वे साहित्यसंमेलन सानेगुरुजींच्या कर्मभूमीत : अमळनेरच्या मराठी वाड्मय...

Jalgaon News : ९७ व्या साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती.
Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan
Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelanSarkarnama
Published on
Updated on

97 Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होणार आहे. ९७ व्या साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी झाले होते.

Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan
Sangola Bazar samiti Election: सत्ताधारी शेकाप, राष्ट्रवादी, शहाजी पाटलांच्या आघाडीला स्वकीयांकडूनच आव्हान: सांगोल्यात प्रस्थापितांचे धाबे दणाणले

या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. त्यानंतर सातारा येथील संस्थेचे दृक्-श्राव्य सादरीकरण पाहिले आणि तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड केली. त्यामध्ये समितीने सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर या संस्थेची शिफारस केली.

Akhil Bharatiya Marathi Sahitya sammelan
Kishor Patil News: ''उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांसारखी जादू नाही..''; पाचोऱ्यातील सभेआधीच किशोर पाटलांनी डिवचलं

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली. पुण्याच्या (Pune) महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यांव्यतिरिक्त प्रकाश पागे, प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com