बलात्काराचा गुन्हा दाखल होऊनही रघुनाथ कुचिकचा राजीनामा का नाही ?

आमची नार्को चाचणी जरुर करा, पण आगोदर कायद्याचा अभ्यास करा.
Raghunath Kuchik - Chitra Wagh
Raghunath Kuchik - Chitra Wagh sarkarnama
Published on
Updated on

पुणे : पिडीत तरुणी व तिला मदत करणाऱ्या आम्हालाच दोषी ठरविण्याचा प्रकार सुरु आहे. सरकारच रघुनाथ कुचिकच्या मुलीला पुढे करून आमच्या नार्को चाचण्या करण्याची मागणी करत आहे. कुचिकचा राज्यमंत्री दर्जाच्या पदाचा अजूनही राजीनामा घेतलेला नाही. याउलट कुचिकचा साथीदार राहुल बोहरा हा सरकारी वकीलास "लल्लु', "जज हमारा है' असे मेसेज पिडीतेला पाठवून न्यायव्यवस्थेबाबत चुकीची भाषा वापरीत आहे. त्यामुळेच आता या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,'' अशी माहिती भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात दिली.

Raghunath Kuchik - Chitra Wagh
मुख्यमंत्र्यांनी `नारायण राणें`चा फोन लगेच घेतला..केव्हाही संपर्क करा, असेही सांगितले!

आमची नार्को चाचणी जरुर करा, पण आगोदर कायद्याचा अभ्यास करा' अशा शब्दात नार्को चाचणीची मागणी करणाऱ्यांना वाघ यांनी सुनावले.मागील आठवड्यानंतर सलग दुसऱ्यांता वाघ यांनी कुचिक प्रकरणासंबंधी पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर टिका केली. वाघ म्हणाल्या, ""पिडीत तरुणी आगोदर पोलीस, सर्व राजकीय पक्ष, त्यांचे देशपातळीवरील नेते यांच्यापासून ते सत्ताधारी पक्षाकडेही न्यायासाठी गेली. परंतु तिची कोणीही दखल घेतली नाही.’’

Raghunath Kuchik - Chitra Wagh
सोमय्यांनी कितीही बडबड केली तरी `त्या` प्रकरणावर बोलू नका : शिवसेना नेत्यांना संदेश

सरकारी यंत्रणेकडून न्याय मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर ती मुलगी माझ्याकडे, भाजपाकडे आली. तिला न्याय देणे दूर, याउलट तिच्यासह तिला मदत केली म्हणून आम्हाला दोषी ठरविले जात आहे. मुलगी खोटे बोलत असेल, तर आगोदर तिची सत्यता तरी तपासून घ्या'' दरम्यान, वाघ यांनी कुचिक प्रकरणातील गुन्ह्यात नोंद असलेल्या राहुल बोहरा याने पिडीत तरुणीला पाठविलेले मेसेज वाचून दाखवित त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी वाघ यांनी केली.

वडगाव शेरी येथे शाळेतच मुलीवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणातील जखमी मुलीचे उपचाराचा खर्च सरकारने करावा. आत्तापर्यंत मुलीच्या वडीलांनी ऊसनवारी करून 70 हजार रुपये रुग्णालयात भरले आहेत. त्यांना ती रक्कम सरकारने द्यावी, अशी मागणी वाघ यांनी केली. तर शिवाजीनगर येथील नामांकीत शाळेच्या स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाचा मात्र वाघ यांनी ओझरता उल्लेख करीत त्यावर बोलण्याचे टाळले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com