
women leaders in Indian politics News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने विजयाची हॅट्ट्रिक केली होती. या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसले तरी मित्रपक्षांच्या मदतीने बहुमताचा आकडा पार करीत 293 जागा पटकावत घवघवीत यश मिळवले. तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे 234 खासदार विजयी झाले होते.
त्यानिमित्त 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीची तुलना करीत असताना प्रकर्षाने काही बाबी जाणवल्या. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे 2024 च्या लोकसभा निकालात सत्ताधारी एनडीए आघाडीला अन् विरोधी इंडिया आघाडीला 'वुमन पॉवर'ने 'जोर का झटका' दिला होता.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारने संसदेत महिला आरक्षण विधयेक मंजूर केले होते. त्यामुळे या निवडणुकीत महिला खासदारांची संख्या वाढेल असे चित्र होते. मात्र, 2024 लोकसभा निवडणुकीत 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत महिला खासदारांची संख्या घटली. विजयी महिला खासदारांची टक्केवारी 13 टक्के इतकी होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपने (BJP) सर्वाधिक 69 महिलांना उमेदवारी दिली होती तर काँग्रेसने 41 महिलांना रिंगणात उतरवले होते.
2019 च्या निवडणुकीत 78 महिला खासदार विजयी झाल्या होत्या तर 2019 च्या निवडणुकीत केवळ 74 महिला खासदार निवडून आल्या. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत महिला खासदारांची संख्या चारने घटली होती. मागील लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पहिली तर महिला खासदारांची संख्या प्रत्येक निवडणुकीगणीस वाढत होती. दुसरीकडे निवडणूक लढविणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या वाढली होती.
2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 556 महिला रिंगणात होत्या. त्यापैकी 69 महिला विजयी झाल्या होत्या. 2014 झाली 668 महिला उमेदवाराने निवडणूक लढली त्यापैकी 62 महिला खासदाराने बाजी मारली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 726 महिलांनी नशीब आजमावले, त्यापैकी 78 महिला विजयी झाल्या तर 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीत 797 महिला उमेदवाराने निवडणूक लढवली त्यापैकी 74 जणींना विजय मिळवता आला.
भाजपच्या सर्वाधिक 30 महिला खासदार
या 74 महिला खासदारामध्ये भाजपच्या सर्वाधिक 30 महिला आहेत तर काँग्रेसच्या (Congress) 14 महिला विजयी झाल्या. तृणमूल काँग्रेस 11, समाजवादी पक्ष 4, डीएमके 3. जेडीयू 2, एलजीपी 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वायएसआर,आरजेडीच्या प्रत्येकी एक महिला खासदार विजयी झाल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
महाराष्ट्रातून सात महिला खासदार झाल्या विजयी
महाराष्ट्रातून गेल्या वेळेस नऊ महिला खासदार विजयी झाल्या. मात्र, यावेळी सातच महिला खासदार विजयी झाल्या आहेत. या विजयी महिला खासदारामध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, प्रणिती शिंदे, शोभा बच्छाव तर भाजपच्या रक्षा खडसे, स्मिता वाघ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या महिला खासदार विजयी झाल्या होत्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.