Bharat Gogawale : रायगडच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, शिंदेंचा वाघ तटकरेंवर ठरला वरचढ! 'त्या' डीलची चर्चा

Raigad Guardian Minister : रायगडच्या पालकमंत्रिपदाची घोषणा करण्यात आली आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद देण्यातआले आहे.
Raigad Guardian Minister Post; Sunil Tatkare and Bharat Gogawale
Raigad Guardian Minister Post; Sunil Tatkare and Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

Raigad Politics : अनेक दिवसांपासून रायगड आणि नाशिकचे पालकमंत्रिपद रिक्त होते. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद होता. मंत्री आदित्य तटकरे या पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी आग्रही होत्या. तर, मंत्री भरत गोगवले हे देखील पालकमंत्रिपदासाठी ठाम होते.

अखेर हा तिढा सुटला असून भरत गोगावले यांचे नाव रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी तर, गिरीश महाजन यांचे नाव नाशिक पालकमंत्रिपदासाठी जाहीर करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये आदिती तटकरे यांचे बंधू रायगडमधून अनिकेत तटकरे हे उभे होते. त्यावेळी शिवसेनेमधून त्यांना विरोध होता. आमदार महेंद्र दळवी यांनी आपल्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी तटकरे यांना त्यावेळी पाठींबा देत त्यांच्या बिनविरोध आमदारकीचा रस्ता मोकळा करत दळवींना माघार घेण्यास भाग पाडले होते.

तटकरे कुटुंबाकडून आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्रिपदावरील दावा सोडण्याचे मान्य केल्याची त्यावेळी चर्चा होती. आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्रिपद सोडण्याची डील झाल्याची देखील रायगडच्या राजकारणात बोलले जात होते. या निवडणुकीनंतर भरत गोगावले हे देखील मीच पालकमंत्री होणार ,असे ठामपणे सांगत होते. अखेर पालकमंत्रिपदासाठी त्यांच्याच नावाची घोषणा करण्यात आली.

Raigad Guardian Minister Post; Sunil Tatkare and Bharat Gogawale
Raigad News : शिवसेनेने आमदारकी सोडली, पण ‘रायगड’चा हट्ट सोडला नाही : अखेर भरतशेठ गोगावले नवे पालकमंत्री, ‘तटकरे’ गटाला धक्का

शिवसेनेमध्ये उत्साह

रायगडच्या राजकारणात तटकरे विरुद्ध शिवसेना असे चित्र निर्माण झाले होते. खासदार सुनील तटकरे हे देखील शिवसेनेच्या नेत्यांना डिवचण्याची संधी सोडत नव्हते. त्यामुळे आमदार महेंद्र दळवी यांनी उघडपणे तटकरेंवर टीका करण्याचे धोरण स्वीकारले होते.तर, भरत गोगावले हे देखील तटकरेंवर उघडपणे तोंडसुख घेत होते. त्यात पालकमंत्रिपद शिवसेनेकडे आल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

तटकरे नवा डाव टाकणार

सुनील तटकरे हे खासदार आहेत. तर, आदित्य तटकरे हे मंत्री आहे तसेच त्यांचे बंधू अनिकेत तटकरे हे विधान परिषदेमध्ये आमदार आहेत. रायगडचेमध्ये तटकरेंची ताकद मोठी आहे. त्यामुळे पालकमंत्रिपद हातून गेले तरी त्यांना फारसा धोका नसल्याचे सांगितले जात आहे. उलट पाच वर्ष पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळाले असते ते पालकमंत्रिपद तटकरेंच्या खेळीने अवघे तीन वर्ष मिळणार आहे. तटकरे हे गोगावले, दळवी यांच्यापेक्षा वरचढ ठरत त्यांनी अनिकेत तटकरेंच्या रुपाने बिनविरोध आमदारकी देखील मिळवत नवा डाव टाकल्याची चर्चा आहे.

Raigad Guardian Minister Post; Sunil Tatkare and Bharat Gogawale
Bharat Gogawale : शासकीय कार्यक्रमात भाजपचा अजेंडा : भरत गोगावलेंकडून थेट राजीनाम्याची भाषा, तटकरेंचीही नाराजी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com