BJP local election strategy : 'स्थानिक'च्या निवडणुकीसाठी भाजपने टाकला डाव; विरोधकांची झोप उडवणारा प्लॅन तयार!

BJP plan local elections News : राज्यात जवळपास दीड कोटी सदस्य नोंदणी करीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे.
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात लवकरच निवडणूक आयोगाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वीच सुप्रीम कोर्टाने गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या निवडणूका चार महिन्याच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या मार्गातील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. त्यामुळे लवकरच या निवडणुका होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत.

निवडणुकीच्या कामात भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका पार पडताच भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली होती. त्यासाठी पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. राज्यात जवळपास दीड कोटी सदस्य नोंदणी करीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे. त्यानंतर बूथनिहाय रचना नव्याने उभा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लवकरच होणार असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी आधीपासूनच तयारी सुरु केली होती.

त्यासोबतच भाजपने (BJP) संघटनानात्मक निवडीवर भर देताना मंडलअध्यक्ष, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष यांची निवड करीत गटबाजीच्या राजकारणाला दूर सारले आहे. त्यानंतर आता येत्या काळात केंद्र सरकार व राज्य सरकारने सर्वच स्तरातील नागरिकांसाठी मोठे काम केले आहे. हे काम ग्रामस्थरापर्यंत पोंहचवण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थेंची मदत घेतली आहे. त्याच्या माध्यमातून भाजपने सर्व नागरीकापर्यंत पोंहचत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहितीही दिली जात आहे. त्यामुळे भाजपकडून राबवलया जात असलेलया संकल्पनेला मोठी मदत होत आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
BJP Internal Survey : ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होणार? भाजपच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये धक्कादायक निष्कर्ष, 150 जागा...

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना जसे की, लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) यांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांना झाला आहे. या योजनांमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील लोकांचे जीवनमान सुधारले आहे.

सरकारच्या डिजिटल माध्यमांचा वापर, जनसंपर्क व जनजागृती मोहिमा, आणि स्थानिक प्रशासनाची सक्रिय भूमिका यामुळे या योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी झाली आहे. या राज्य सरकारच्या प्रभावीपणे राबवलेल्या योजना अनेक स्वयंसेवी संघटनासोबतच भाजपने त्यांच्या पदाधिकारी व नेतेमंडळीला सोबत घेऊन नागरिकापर्यंत पोहचविण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Ajit Pawar: सत्ता,पद असूनही अजितदादांनी 'माळेगाव'च्या निवडणुकीचा एवढा धसका का घेतला? 'ही' आहेत महत्त्वाची कारणं

महायुती एकत्रित निवडणूका लढणार

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहे. ही निवडणूक महायुतीमधील मित्रपक्ष असलेले भाजप, शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सर्व एकत्रित लढणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीमधील तीन ही पक्षांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लागेल आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
NCP Politics : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही? पुण्यात 10 जूनला सगळं स्पष्ट होणार...

100 दिवसांचा कृती कार्यक्रम राबवणार

स्थानिकच्या निवडणुकीत विजय संपादन कारण्यायसाठी भाजपने कार्यकर्त्यांसाठी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आखला आहे, ज्यामध्ये पक्षाच्या प्रचारावर भर देण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रत्येक बुथवरील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. तसेच, येत्या याकाळात 'कमळ' चिन्हाचे मार्केटिंग करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश निवडणुकीपर्यंत केवळ भाजपचीच चर्चा राहील, अशा प्रकारची रणनीती आखली आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde Politics: सुधाकर बडगुजर यांचा मार्ग आणखी खडतर... शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांनाही बडगुजर नकोच!

सामाजिक, धार्मिक संघटनांची घेतली जातेय मदत

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वारकरी संप्रदाय यांसारख्या सामाजिक आणि धार्मिक संघटनांची मदत घेतली होती. त्याच प्रमाणे आता येत्या काळात स्थानिकांच्या निवडणूक प्रचारासाठी विविध सामाजिक संघटना,स्वयंसेवी संस्थेंची मदत घेतली जात आहे. त्या संघटनाच्या माध्यमातून गल्लोगल्ली, प्रत्येक वॉर्डामध्ये सक्रिय सहभाग वाढवला जात आहे.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
Eknath Shinde Ministers Upset: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीनाट्य! अजिदादांवर एकनाथ शिंदेंचे मंत्री नाराज; नेमकं कारण काय?

येत्या काळात राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपची ही रणनीती अत्यंत प्रभावी ठरणार आहे. महायुतीच्या माध्यमातून एकत्रित निवडणूक लढविणे, उमेदवार निवडीत पारदर्शकता, 100 दिवसांचा कृती कार्यक्रम, आणि सामाजिक संघटनांची मदत या सर्व घटकांनी विरोधकांसाठी मोठे आव्हान येत्या काळात उभे केले आहे. भाजपकडून येत्या तीन महिन्यात अशा प्रकारची रणनीतीचा वापर केल्यामुळे येत्या काळात विरोधकांची झोप उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

BJP, Devendra Fadnavis, Chandrashekhar Bawankule
NCP Sharad Pawar : 'आघाडी होवो अथवा ना हो, तयारीला लागा'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने नेमले निरीक्षक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com