Eknath Khadse attacks BJP : भाजपमधील भ्रष्टाचाऱ्यांवर खडसेंचा प्रहार.. CM फडणवीस यांना मात्र 'सॉफ्ट कॉर्नर'

BJP corruption allegations News : जेलमध्ये गेलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेली मंडळीसुद्धा भाजपमध्ये सामील होत आहेत, त्यांच्याकडे नैतिकता शिल्लक राहिली नसल्याची टीका होत आहे.
Eknath Khadse, Devendra Fadnavis
Eknath Khadse, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपवर आरोप करण्याची एकही संधी माजी मंत्री एकनाथ खडसे सध्या सोडत नाहीत. सातत्याने ते भाजपवर आरोप करण्याची व टीका करण्यासाठी कारणच शोधून धारेवर धरतात. 2014 पूर्वीची भाजपही भ्रष्टाचारमुक्त आणि गुन्हेगारमुक्त होती. मात्र, गेल्या काही दिवसापासून इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले 90 टक्के बाहेरची मंडळी भ्रष्टाचारात अडकलेली आहे. विशेषतः एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी महसुल मंत्रीपदाचा 2016 मध्ये राजीनामा दिला होता. पण आता जेलमध्ये गेलेले किंवा ईडी चौकशीत अडकलेली मंडळीसुद्धा भाजपमध्ये सामील होत आहेत, त्यांच्याकडे नैतिकता शिल्लक राहिली नसल्याची टीका करीत यांनी भाजपला पुन्हा एकदा आरसा दाखवला आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने प्रभावी कामगिरी करत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. विशेषतः महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद अशा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते महायुतीच्या वाटेवर येताना दिसत आहेत. त्यामुळे महायुतीने पक्षात प्रवेश देण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray: भास्कर जाधवांच्या धडाडत्या तोफेचं तोंड ठाकरेंकडेच! नाराजीवर मार्ग काढण्यासाठी मातोश्रीवर आमंत्रण

महायुतीकडे मतदारांचा कल व सत्ता केंद्रित होत असल्यामुळे अनेक नेते राजकीय भवितव्य लक्षात घेऊन पक्षांतर करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतून इनकमिंग वाढत असल्याचे स्पष्टपणे दिसते. काही ठिकाणी तर स्थानिक पातळीवर असंतोष, नेतृत्वातील विसंवाद आणि संघटनात्मक कमकुवतपणा देखील यामागील प्रमुख कारणे म्हणून समोर येत आहे. त्यामुळे येत्या काळात महायुतीमध्ये प्रवेश देताना काही निकष पाळणे गरजेचे आहे. अन्यथा अडचणीत भरच पडणार आहे.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
Raj Thackeray : ‘शिवतीर्था’वर दादा भुसेंचे ततपप; गेले समजूत काढायला अन् राज ठाकरेंनी घावच घातला...

एकनाथ खडसे (Ekanath Khadse) यांनी याबाबत नुकतेच वक्तव्य केले आहे. भाजपमधील 90 टक्के नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. यापूर्वीच्या काळात भ्रष्टाचार असल्याचा कठोर आरोप झाले असतील तेव्हा लगेच जबाबदारीची भूमिका घेतली जात होती. नेतेमंडळी पदाचा राजीनामा देत होती. 2016 साली मी देखील आरोप झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, गेल्या एकही दिवसापासून भाजपमधील वातावरण बदलले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर देखील राजीनामा दिला जात नाही. उलट त्यामधून वाचवण्याची भूमिका घेतली जात आहे.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
Babanrao Lonikar Controversy Statement : जीभ घसरलेल्या बबनराव लोणीकरांवर सुषमा अंधारेंचा प्रहार; म्हणाल्या, 'लाचार...'

या पूर्वीच्या काळात भाजपमध्ये (BJP) भ्रष्टाचार करणाऱ्या व गुन्हेगाराना संधी दिली जात नव्हती. आता पक्षात नव्याने आलेली 90 टक्के मंडळी ही भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. ईडी चौकशीसारख्या गंभीर प्रकरणात अडकलेले पण पक्षात घेतले जात आहेत, यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
BJP Municipal Chief Controversy: धक्कादायक! भाजप नगराध्यक्षाचे पद वाचविण्यासाठी अधिकारी चक्क आयसीयूत दाखल?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तेही आज भाजपसोबत सत्तेत बसले आहेत. त्यामुळे भाजप हा विषय माझ्यासाठी पूर्णपणे संपला आहे. मी अंधारात असताना मला साथ देणाऱ्या शरद पवार यांच्यासोबतच मी राहणार असल्याचे खडसेंनी स्पष्ट करीत भाजपवर चौफेर टीका केली.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
Dada Bhuse Politics: शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षणमंत्र्यांना घ्यावी लागली हजेरी...मात्र विद्यार्थ्यांची नव्हे तर चक्क शिक्षकांचीच!

याच वेळी खडसे यांनी या सर्व प्रकाराला देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला दोष देणे चुकीचे आहे. या प्रक्रियेत असणारे सर्व आणि पक्षात प्रवेश देणारे संघटनेचे नेते भाजपच्या या अवस्थेला जबाबदार असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला. गेल्या काही दिवसपासून भाजपमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंडळीना संधी दिली जात आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या मंडळींना पक्षात प्रवेश देणे टाळणे गरजेचे आहे.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
NCP SP Politics : पेशवाई नको म्हणत... शरद पवारांच्या पक्षाने सुचवली पुणे स्थानकासाठी पाच नावं

विधानसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी दमदार राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील नेत्यांचे इनकमिंग जोरदार वाढले आहे. मात्र, पक्ष प्रवेश देताना भाजप व त्यांच्या मित्र पक्षाने काही निकष पाळण्याची आवश्यकता आहे. अन्यथा येत्या काळात अशा नेतेमंडळीमुळे अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.

Eknath Khadse, Devendra Fadnavis
Ajit Pawar : अवघड वाटणारी ‘माळेगाव’ची निवडणूक अजितदादांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे फिरली!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com