Budget 2023 Updates : तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के, मग सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे? नेमकं काय आहे गणित?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला.
Budget 2023 Updates : तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के, मग सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे? नेमकं काय आहे गणित?
Published on
Updated on

Budget 2023 Updates : ''केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात केंद्र सरकारने सात लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. पण दुसरीकडे तीन ते सहा लाख रुपयांपर्यंच्या उत्पन्नावर पाच टक्के करही आकारण्यात आला आहे. याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रम आहे. आता नव्या करप्रणालीनुसार ३ ते ६ लाखांपर्यंत पाच टक्के,मग सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे? असा सवाल उपस्थित होत आहे.

वित्त सल्लागार, रितेश मुथियान यांनी सरकारनामाला दिलेल्या माहितीनुसार, नव्या अर्थसंकल्पातील नव्या करप्रणालीनुसार, शुन्य ते तीन लाख उत्पन्न असलेल्यांना करातून सुट देण्यात आली आहे. तर तीन ते सहा लाख उत्पन्नावर पाच टक्के कर भरावा लागणार आहे. म्हणजे तीन लाखांवर पाच टक्क्यांप्रमाणे १५ हजार रुपये कर भरावा लागतो. तर सहा ते नऊ लाख उत्पन्न असलेल्यांना १० टक्के कर भरावा लागणार आहे. आता सहा ते सात लाख रुपये म्हणजे एक लाख रुपये होतात. या एक लाखांवर दहा टक्क्यांप्रमाणे म्हणजे १० हजार रुपये कराची रक्कम होते.

Budget 2023 Updates : तीन ते सहा लाखांपर्यंत पाच टक्के, मग सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त कसे? नेमकं काय आहे गणित?
Sudhir Mungantiwar : लोकशाहीची फळे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणारा अर्थसंकल्प !

सात लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असे सरकारने जे सांगितलं आहे, त्यामागचं गणित नक्की काय?

तीन-ते सहा लाखांवर पाच टक्क्यांप्रमाणे १५ हजार, सहा ते सात लाख यावर १० टक्क्यांप्रमाणे १० हजार म्हणजे एकूण २५ हजार अशी कराची रक्कम होते. पण या २५ हजारांची तुम्हाला सवलत देण्यात आली आहे. म्हणजे जर तुमचे उत्पन्न सात लाखांच्या आत असेल, तरच या करातून तुम्हाला सवलत दिली जाईल. पण जर तुमचे उत्पन्न सात लाखांच्या वर म्हणजे सात लाख एक हजार रुपये जरी असेल तर तुम्हाला वरील २५ हजार रुपयांचा कर भरावाच लागणार आहे.

नवीन करप्रणाली ही येत्या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केलं आहे. पण नवी व जुनी कर प्रणाली हे दोन्ही पर्याय सध्या तरी करदात्यांसमोर पर्याय म्हणून उपलब्ध आहेत, मात्र पुढे जाऊन फक्तं नवीच कर प्रणाली अस्तित्वात राहील यादृष्टीने सरकारचे पाऊल पडल्यास आश्चर्य वाटू नये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com