भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, आमचं सरकार येईपर्यंत हार, फेटा नाही अन् एक वेळच जेवण

देशभरात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : देशभरात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरू आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असताना आता भाजपच्या (BJP) एका प्रदेशाध्यक्षांनी मोठी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील सरकार सत्तेतून घालवल्याशिवाय फेटा न घालण्याची प्रतिज्ञा केली आहे. याचबरोबर रात्रीचे जेवण सोडण्याचाही निर्धार त्यांनी केला आहे. त्यांच्या या घोषणेची आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.

राजस्थानचे (Rajasthan) भाजप प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया (Satish Poonia) यांनी ही प्रतिज्ञा केली आहे. राजस्थानमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आहे. पुनिया हे उत्तर प्रदेशील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत. ते दोन दिवस उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. तेथे बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. याचवेळी उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपची सत्ता येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

BJP
मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे होताहेत घटस्फोट! अमृता फडणवीसांचा दावा

जाहीर सभेत बोलताना पुनिया म्हणाले की. राजस्थानमधील काँग्रेस सरकार हे तरुणविरोधी आणि शेतकरीविरोधी आहे. या सरकारला सत्तेतून घालवल्याशिवाय मी हार आणि फेटा घालणार नाही. याचबरोबर रात्रीचे जेवणही मी घेणार नाही. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल. भाजप राज्यात बहुमताने जिंकेल, असा मला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनकल्याणाच्या धोरणांमुळे जनता आम्हालाच साथ देईल.

BJP
नवरा-बायकोच्या भांडणात पोलीस हवालदारानं मागितली लाच अन् हातात पडल्या बेड्या

पुनिया यांनी ही घोषणा केली असली तरी अशीच घोषणा मागील विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी केली होती. राजस्थानमध्ये 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसला होता. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होईपर्यंत फेटा न घालण्याची प्रतिज्ञा केली होती. राज्यात 2018 मध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर अखेर त्यांनी फेटा घातला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com