
विधानसभेचा विरोधी पक्षनेता अद्याप नियुक्त नाही – निवडणुकीनंतर ८ महिने उलटूनही विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे, महाविकास आघाडी यासाठी प्रयत्नशील आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपला – त्यांच्या कार्यकाळानंतर आता हे पद रिक्त असून काँग्रेसकडे संख्याबळ जास्त आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विरोधी नेतेपदावर रस्सीखेच – दोन्ही पदांसाठी महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चा आणि नावांची चाचपणी सुरु आहे.
Mumbai News : राज्यातील विधानसभेच्या निवडणूका होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. या निवडणुकीत महायुतीने 232 जागा जिंकत मोठया फरकाने विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडीची दाणदाण उडाली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत येऊन आठ महिने झाले आहेत. तर दुसरीकडे तीन अधिवेशने झाली आहेत. त्यानंतरही विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडला गेला नाही.
विरोधी पक्षनेत्याची घोषणा करावी, यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे. दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danave) यांचा कार्यकाळ बुधवारी संपला. दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर आता कोण येणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या नेत्याची निवड होईपर्यंत दोन्ही पदे रिक्त राहणार का ? असा सवाल सतावत आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता पावसाळी अधिवेशनाचा समारोप होत आहे. त्यामुळे येत्या काळात विधानसभेचा विरोधी पक्षनेता व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड कधी केली जाणार याची उत्सुकता लागली आहे. या दोन्ही पदासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहवयास मिळत आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणाचे नाव पाठवले जाणार याची उत्सुकता लागली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ बुधवारी संपला. अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्याने आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर आता कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या विरोधी पक्षातल्या पक्षाचे संख्या बळ जास्त त्याचा विरोधी पक्षनेता होतो.
दानवे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या आमदारांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे या पदावर काँग्रेसचा दावा असणार आहे. त्यात शिवसेना ठाकरे गट आपला दावा सोडणार का? हे महत्वाचे आहे. त्यामुळे विधान परिषदेत पुढचा विरोधी पक्षनेता कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषदेत काँग्रेस पक्षाचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे सहाजिकच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे. मात्र काँग्रेस पक्षात हे पद कोणाला मिळते याबाबत एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून या पदासाठी सतेज पाटील व राजेश राठोड यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. या जागी कोणाची तरी वर्णी लावण्यात यावी यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्ष नेतेपद महाविकास आघाडीला देण्याची मागणी केली आहे. मात्र, या विरोधकांच्या मागणीकडे सत्ताधाऱ्याकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपत आले असतानाच हातात तरी काही निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद किती काळापासून रिक्त आहे?
– गेल्या आठ महिन्यांपासून हे पद रिक्त आहे.
अंबादास दानवे कोण होते?
– ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते.
विधान परिषदेत सध्या कोणता पक्ष मजबूत आहे?
– काँग्रेसकडे सर्वाधिक संख्याबळ आहे.
शिवसेनेचे कोणते नेते विरोधी पक्षनेतेपदासाठी चर्चेत आहेत?
– भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.