Fadnavis Uddhav Offer : फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर... पण शिंदेंचं टेन्शन 'खरंच' वाढलं : पडद्यामागे नेमकं काय शिजतंय?

Eknath Shinde Political Pressure News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहण्यालायक झाला होता.
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

1. फडणवीस यांची उद्धव ठाकरेंना ऑफर: विधान परिषदेच्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची खुलेआम ऑफर दिली, ज्यामुळे एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

2. महायुतीतील अंतर्गत तणाव: शिंदे गटातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप, वादग्रस्त वक्तव्ये, आणि निधी वाटपाबाबतचा असंतोष यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

3. राजकीय हालचालींची शक्यता: स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि मनसे-ठाकरे गटाच्या संभाव्य एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वातावरण अधिकच तापवत आहेत.

Mumbai News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपला. त्यानिमित्ताने निरोप समारंभाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक गमतीजमती पहावयास मिळाल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची खुली ऑफर दिली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. महत्त्वाचे म्हणजे सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतानाच ऑफर देण्यात आली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहण्यालायक झाला होता. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ही ऑफर फेटाळून लावली असली तरी पडद्यामागे येत्या काळात काही शिजतेय का? याची उत्सुकता लागून राहिली आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. त्यामुळे आगामी चार वर्षांत तरी मोठ्या राजकीय घडामोडी घडतील असे वाटत नव्हते. मात्र, राजकारणात काहीही घडू शकते हे गेल्या तीन वर्षापूर्वीचा अनुभव पाहिला तर नक्कीच लक्षात येईल. तीन वर्षांपूर्वी बहुमतात असलेले उद्धव ठाकरे यांचे सरकार शिवसेनेतच (Shivsena) उभी फूट पडल्याने पडले होते.

त्यामुळे राजकारणात काहीही घडू शकते. मात्र, या सर्व गोष्टीला पूर्णविराम देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, 2029 सालापर्यंत म्हणजे विधानसभा निवडणुका होईपर्यंत काहीच बदल होणार नसल्याचे सूचित करीत त्यांनी आम्ही विरोधी पक्षात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे विरोधी पक्षालाच सत्ताधारी पक्षात येण्यासाठी स्कोप असल्याचे सांगत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दिली आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
BMC Election Survey : एकत्र आल्यास ठाकरे बंधूंची चांदी... नाहीतर भाजपने दणका दिलाच म्हणून समजायच : ठाकरेंचा सर्व्हे काय सांगतो?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis ) उद्धव ठाकरेंना ऑफर देताना म्हटले की, ‘उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला येथे यायचे असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे , असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
PM Modi future decision : एक निर्णय ठरवणार PM मोदींचं भविष्य : पंच्याहत्तरीपूर्वीच 'निवृत्तीच्या' सल्ल्याला टाचणी लावण्याचा प्लॅन

हा सर्व घटनाक्रम पाहिला तर निश्चितच येत्या काळात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी सूचक इशारा मानला जात आहे. फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या चेहराच खूप काही सांगून जात होता. गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पहिला तर महायुतीमध्ये सर्वच काही आलबेल दिसत नाही. विशेषतः शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते वादग्रस्त वक्तव्य व टिप्पणी करीत वाद अंगावर ओढवून घेत आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. विशेषतः या मंत्र्यांना व नेत्यांना समज द्यावी, अशी मागणी भाजपकडून केली जात आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
PM Modi’s Strategy : 30 व्या वर्षीच दोन्ही पाय तोडले, तरीही लढले! पंतप्रधान मोदींचा विधानसभेसाठी 'मास्टर'स्ट्रोक

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक जणांवर या पावसाळी अधिवेशन काळात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, माजी मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांच्यावर भ्रष्टचाराचे आरोप झाले तर संजय गायकवाड यांनी केलेली मारहाण शंभूराज देसाई यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिंदे यांची शिवसेना बॅकफूटवर आली आहे. दुसरीकडे निधी वाटपावरून सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून केल्या जात असलेल्या आरोपामुळे सरकारची प्रतिमा मालिन होत असल्याने भाजपकडून ठाकरेंना दिलेली ऑफरही नक्कीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Shivsena UBT : दोन जिल्हाप्रमुख एकमेकांचे तोंडही बघत नाहीत; एकच जिल्हाप्रमुख नेमा : ठाकरेंच्या शिवसेनेत खदखद

एकनाथ शिंदे यांचा चेहरा का बघण्यासारखा झाला ?

सभागृहाबाहेर जेव्हा आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्यावेळीही दोघांमध्ये झालेला संवाद अत्यंत बोलका होता. एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली. त्यावेळी आदित्य ठाकरे फडणवीस यांना म्हणाले, तुम्ही ऑफर दिली त्यामुळे तुमच्या स्वागताला उभा आहे. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने फडणवीस यांना या प्रसंगाबद्दल अधिक विचारले. तेव्हा आदित्य ठाकरे म्हणाले, 'काही नाही, गंमत केली'. तर फडणवीस म्हणाले, 'थोडं वातावरण लाईडेट राहतं'. पण फडणवीस यांची आजवरची राजकीय वाटचाल बघितलेले एक नक्की सांगू शकतात की, ते कधीच कोणती गोष्ट सहज, मनात आली म्हणून बोलत नाहीत. त्यांची गंमतही अत्यंत विचारपूर्वक असते. कदाचित याचमुळे एकनाथ शिंदे यांचाही चेहरा बघण्यासारखा झाला होता.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
BJP Politics: स्थानिक नेत्यांना पक्षात घेण्याचा भाजपचा सपाटा; कुंभमेळ्याच्या निमित्तानं हिंदुत्ववादी प्रतिमा उजळविणार

गेल्या काही दिवसातील घडामोडी पाहता महायुतीमधील वातावरण पूर्वीप्रमाणे राहिले नसल्याची चर्चा जोरात सुरु आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही सध्या तसेच वातावरण आहे. आगामी कळत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच येत्या काळात मनसे-उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळेच कदाचित फडणवीस यांनी आमच्यासोबत या असे म्हणत ठाकरे बंधूंच्या बोलणीत खडा टाकला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Uddhav Thackeray Politics : राज ठाकरे गाजवून गेले, आता उद्धव ठाकरे गाजवणार नाशिकचं मैदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत सहभागी होण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी धुडकावून लावली आहे. फडणवीसांनी दिलेल्या ऑफरबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सभागृहात या गोष्टी खेळीमेळीने झाल्यात आणि त्या गोष्टी खेळीमेळीनेच घ्यायला हव्यात,' असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या ऑफरवर पडदा पडला आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
BJP Politics : नागपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 40 कोटींचा घोटाळा? सचिवच बनला भ्रष्ट? भाजपचे आमदार आक्रमक

गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी पडद्यामागे घडत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी कळत होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षाकडून पर्यायी युती व आघाडीची बोलणी सुरु आहे. त्यामुळे नेमके पडद्यामागे काय शिजत आहे का, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Shivsena Politics : अखेर एकनाथ शिंदेंनी शिरसाट अन् गायकवाडांना दिली समज, म्हणाले, "शिवसेनेची प्रतिमा..."
  1. प्रश्न: देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला सत्तेत येण्याची ऑफर दिली?
    उत्तर: त्यांनी उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली.

  2. प्रश्न: एकनाथ शिंदे यांच्या गटावर कोणते आरोप झाले आहेत?
    उत्तर: शिंदे गटातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि वादग्रस्त वक्तव्ये झाली आहेत.

  3. प्रश्न: उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची ऑफर स्वीकारली का?
    उत्तर: उद्धव ठाकरे यांनी ती ऑफर खेळीमेळीचा भाग म्हणून फेटाळली.

  4. प्रश्न: राजकीय हालचालींमुळे काय चर्चा सुरू आहेत?
    उत्तर: मनसे-ठाकरे गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चा आणि नव्या आघाड्यांच्या शक्यता चर्चेत आहेत.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Raj Thackeray Tribal Protest: आदिवासी विकास भवनला आंदोलकांचा घेरा... बिऱ्हाड मोर्चेकरी संतापले, आता प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com