vice president election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडे नाही बहुमत... मित्र पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार?

Political News : गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसने पुढकार घेतला असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकसभेत व राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे येत्या काळात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला मित्र पक्षांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.
Narendra Modi | Rahul Gandhi
Narendra Modi | Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : जगदीप धनखड यांनी चार दिवसापूर्वी तब्येतीचे कारण देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांनी दिलेला राजीनामा राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. त्यामुळे येत्या काळात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असल्याने देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढविणार नाही, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसने पुढकार घेतला असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकसभेत व राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे येत्या काळात उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपला मित्र पक्षांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

संसदेतील दोन्ही सभागृहात भाजपकडे (Bjp) बहुमत नाही. बहुमतासाठी भाजपला एनडीए आघाडीतील मित्रपक्षावर अवलंबून राहवे लागणार आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभेतील सदस्यांना मतदानाचा हक्क असणार आहे. ही निवडणूक जिकंण्यासाठी 394 मताची आवश्यकता आहे. त्यामुळेच भाजपकडून मित्रपक्षाला रुचेल अशा नावाची घोषणा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्य परिस्थितीत सर्व पक्षाचा पाठींबा असलेल्या नावाचा शोध घेतला जात आहे.

Narendra Modi | Rahul Gandhi
BJP Jaykumar Gore action : रोहित पवारांच्या मतदार संघातील ग्रामपंचायतीवर मंत्री गोरेंची मोठी कारवाई

भाजपकडे लोकसभेत व राज्यसभेत निर्विवाद बहुमत नाही. त्यामुळे भाजपला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटकपक्षावर अवलंबून राहावे लागणार आहे. लोकसभेत 542 सदस्यापैकी एनडीए आघाडीला 293 खासदारांचा पाठींबा आहे. त्यामध्ये भाजपचे 240 खासदार आहेत. बहुमतासाठी आवश्यक असलेले 272 हे संख्याबळ त्यांच्याकडे नाही. तर मित्र पक्ष असेलल्या तेलगु देसम 16, संयुक्त जनता दल (जेडीयू) 12 यांच्यासह एकनाथ शिंदेंची शिवसेना 7, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 5, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 1, अपक्ष 2 अशा एकूण 293 खासदारांचा मोदी सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपला त्यांच्या मित्रपक्षाची मनधरणी करावी लागणार आहे.

Narendra Modi | Rahul Gandhi
Ajit Pawar : अखेर मारहाण झालेल्या विजय घाडगेंना अजितदादांचा मोठा शब्द; मंगळवारी घेणार निर्णय

लोकसभेत 542 सदस्यांमध्ये इंडिया आघाडीला 293 खासदारांचा पाठींबा आहे तर राज्यसभेच्या 285 सदस्यापैकी 129 सदस्याचा पाठींबा आहे. राज्यसभेत सध्या पाच तर लोकसभेत एक जागा रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 786 पैकी 422 सदस्यांचे समर्थन असून या बहुमतावर त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र ऐनवेळी मित्र पक्षाने साथ सोडली तर भाजपपुढील अडचणी वाढणार आहेत.

Narendra Modi | Rahul Gandhi
Kailas Gorantyal joins BJP : 'आईना बनने का हर्जाना तो भरना है मुझे'; शेरोशायरी करत काँग्रेसचा 'कैलास' भाजपच्या वाटेवर...

दुसरीकडे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्याची तयारी काँग्रेसकडून सुरु झाली आहे. विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार असेल असे काँग्रेसकडून (Congress) स्पष्ट करण्यात आले आहे. संसदेतील संख्याबळ इंडिया आघाडीला अनुकुल आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचा एकच उमेदवार असणार आहे.

Narendra Modi | Rahul Gandhi
Shivsena Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ एकनाथ शिंदेंच्या एकत्र येण्याबाबत शिवसेना मंत्र्याचे मोठे विधान; म्हणाले ‘ते दोघेही मिठ्या मारतील...’

लोकसभेत काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीचे संख्याबळ 234 इतके आहे. त्यामध्ये काँग्रेस 99, समाजवादी पार्टी 37, तृणमूल काँग्रेस 29, द्रमुक 22, उद्धव ठाकरे यांची शिवसेना 9, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 8, सीपीम 4, राष्ट्रीय जनता दल 4 व अपक्ष 7 व इतर 15 असे 234 इतके संख्याबळ आहे. त्यामुळे काँग्रेसने भाजपकडील काही मित्र पक्षाचे खासदार गळाला लावल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे भाजपकडून आतापासूनच मित्रपक्षा सोबत चर्चा केली जात आहे.

Narendra Modi | Rahul Gandhi
NCP ministers trouble : : काँग्रेससोबत असो की भाजपसोबत... राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोण अडचणीत आणतयं?

भाजपकडून मित्र पक्ष असेलल्या तेलगु देसम, संयुक्त जनता दल (जेडीयू), एकनाथ शिंदेंची शिवसेना, चिराग पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला विश्वासात घेऊन उमेदवार देण्यात येणार आहे. भाजपकडे बहुमत नसल्याने त्यांना या मित्र पक्षांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणार आहेत.

Narendra Modi | Rahul Gandhi
Manikrao Kokate Politics: काँग्रेसचे स्पष्टीकरण, कृषिमंत्री कोकाटे यांचे स्वागत केलेच नाही, कोकाटे यांनीच केला आमचा सत्कार अन् दिल्या शुभेच्छा!

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभेतील सदस्यांना मतदानाचा हक्क असणार आहे. ही निवडणूक जिकंण्यासाठी 394 मताची आवश्यकता आहे. लोकसभेत 542 सदस्यांमध्ये एनडीए आघाडीला 293 खासदारांचा पाठींबा आहे तर राज्यसभेच्या 285 सदस्यापैकी 129 सदस्याचा पाठींबा आहे. राज्यसभेत सध्या पाच तर लोकसभेत एक जागा रिक्त आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 786 पैकी 422 सदस्यांचे समर्थन असून या बहुमतावर त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकतो.

त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडे लोकसभेतील 234 तर राज्यसभेतील 78 सदस्याचा पाठींबा आहे. त्यामुळे काँग्रेसच्या इंडिया आघाडीकडे 312 मते आहेत. तर जवळपास 50 मते तटस्थ आहेत. त्यामुळे येत्या काळात होत असलेली उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक रिंगणात एनडीए व इंडिया आघाडीचे उमेदवार असल्याने ही लढत चुरशीची होणार आहे.

Narendra Modi | Rahul Gandhi
Mahayuti strategy change : ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे बलाढ्य महायुतीने बदलली रणनीती? मुंबईत एकत्र लढण्यावाचून पर्यायच नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com