Lok Sabha Election 2024: "कुणी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये..." अजित पवार गटाचा शिवतारेंना सबुरीचा सल्ला

Baramati Lok Sabha: बारामती लोकसभेच्या जागेमुळे युतीमधील मतभेद उघड झाले आहेत. बारामती लोकसभेसाठी आपण पवारांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणार असल्याची भूमिका शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतली आहे.
Ajit Pawar, Vijay Shivtare
Ajit Pawar, Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Vijay Shivtare News : राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. महायुतीने या निवडणुकीत ४५ जागांवर विजयी होण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी राज्यभरात विविध नेत्यांच्या भेटीगाटी महायुतीमधील नेते घेत आहेत. मात्र, बारामती लोकसभेच्या जागेमुळे युतीमधील मतभेद उघड झाले आहेत. बारामती लोकसभेसाठी आपण पवारांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणार असल्याची भूमिका शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी घेतली आहे.

यानंतर शिवतारेंची समजूत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काढली तरीदेखील शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शिवतारेंच्या याच भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपेंनी (Anand Paranjape) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय शिवतारेंनी (Vijay Shivtare) युतीधर्म पाळला नाही, तर महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) ज्या लोकसभेच्या (Lok Sabha) जागा लढवणार आहे, तिथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील युतीधर्म तोडू शकतात, असा इशारा वजा धमकीच परांजपे यांनी शिंदे गटाला दिली आहे. अशातच आता पुन्हा एकदा त्यांनी या विषयावर भाष्य करत शिवतारेंना सबुरीचा सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्रकारांनी शिवतारेंच्या भूमिकेबाबत परांजपे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "काल मुंबईमध्ये सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, शिवतारेंना महत्त्व देऊ नका. त्यांच्याबाबतचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. शिवाय राजकारणात कुठला विषय किती ताणायचा आणि सोडून द्यायचा, याला खूप महत्त्व असते. त्यांनी गाय मारली म्हणून आपण वासरू मारू नये," असं म्हणत परांजपे यांनी शिवतारेंनी हा विषय आणखी ताणू नये, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

राज ठाकरेंचे महायुतीमध्ये स्वागत

परांजपे यांनी या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे महायुतीमध्ये आले तर आम्ही त्यांचं स्वागत करू असं वक्तव्य केलं. ते म्हणाले, राज ठाकरे-अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यातदेखील नुकतीच एक बैठक झाली. महायुतीमध्ये मनसे सहभागी होईल, अशी घोषणा ते लवकरच करतील. आम्ही मनसेचे स्वागत करू. जे-जे घटक पक्ष येतील त्यांचे स्वागत महायुती करेल. महायुतीमधील सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघेही बसून योग्य निर्णय घेतील, महायुतीत जागावाटपात प्रत्येकाला संधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Ajit Pawar, Vijay Shivtare
Lok Sabha Election 2024 : दुसऱ्यांकडे पक्ष गहाण ठेवायची ही राज ठाकरेंंची जुनीच पद्धत; राऊतांची बोचरी टीका!

दरम्यान, त्यांनी मनसेची विचारधारा महायुतीशी मिळतीजुळती असल्याचंही सांगितलं. परांजपे म्हणाले, अनेक वेळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत दिले आहेत की, मनसेची विचारसरणी, ध्येयधोरणे ही भाजपशी मिळतीजुळती आहेत. महायुतीत त्यांना घेतल्यामुळे कुठेही वैचारिक विचारधारा वेगळी आहे असे होणार नाही. त्यामुळे मनसेच्या महायुतीत येण्यावर आश्चर्य व्यक्त करण्याची गरज नाही.

(Edited By Jagdish Patil)

R

Ajit Pawar, Vijay Shivtare
Chitra Wagh On Sanjay Raut : 'येथे ओशाळले लॉजिक' म्हणत चित्रा वाघ यांनी राऊतांना धू-धू धुतले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com