Eknath Shinde: भाजपने तुटेपर्यंत ताणले पण शेवटी शिंदेंच भारी ठरले! वाटाघाटीत वाटाण्याच्या अक्षताही हाती लागू दिल्या नाहीत

Eknath Shinde: ठाणे महापालिकेच्या रणसंग्रामाचा पडदा चिन्हवाटपानंतर उघडला आहे. यामध्ये एक मुद्दा ठकळ दिसतो तो म्हणजे महायुती कागदावर असून मैदानात सगळा खेळ शिवसेना शिंदे गटाचाच आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या रणसंग्रामाचा पडदा चिन्हवाटपानंतर उघडला आहे. यामध्ये एक मुद्दा ठकळ दिसतो तो म्हणजे महायुती कागदावर असून मैदानात सगळा खेळ शिवसेना शिंदे गटाचाच आहे. चिन्हवाटपानंतर उघड झालेल्या प्रभागनिहाय पॅनेल रचनेतून महायुतीतील वजन पूर्णपणे शिवसेना शिंदे गटाकडे झुकले आहे. पालिकेच्या ३३ प्रभागांच्या अ, ब, क, ड अशा चार जागांच्या पॅनेलवर शिंदे गटाने थेट १२ प्रभागांमध्ये चारही जागा काबीज करीत निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. तुलनेत भाजपला फक्त तीनच पूर्ण पॅनेल मिळाले आहेत. उरलेल्या प्रभागांत 'मैत्रीपूर्ण समन्वय' दाखवण्यापुरतीच भूमिका भाजपच्या वाट्याला आली असल्याचे रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांच्या यादीवरून स्पष्ट होत आहे.

Eknath Shinde
Amit Thackeray: राज ठाकरे की उद्धव ठाकरे? कोण मुख्यमंत्री झालेलं आवडेल? अमित ठाकरेंनी दिलं सडेतोड उत्तर

२०१७ ला झालेल्या ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चार प्रभागांचा एक पॅनेल अशा पद्धतीने एकूण ३३ पॅनेल होते. चार पॅनेलनुसार ठाणे महापालिकेत प्रथमच निवडणूक होणार होती; मात्र या ३३ पॅनेलमधून १३१ जागांसाठी एक हजार १३४ उमेदवार रिंगणात उतरले. त्यात १३१ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ६७ जागांवर विजय मिळवला. ३४ नगरसेवकांसह राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर होती. तर २३ नगरसेवक भाजपचे निवडून आले. शिवसेनेने सर्वाधिक १२ पॅनेलवर एकहाती वर्चस्व मिळवले. तर भाजपने तीन पॅनेल राखले. या सूत्रानुसारच यंदाही पॅनेल वाटप झाले असल्याचे दिसते.

Eknath Shinde
PSI Death: धक्कादायक! तासगावच्या पोलीस उपनिरिक्षकानं पुण्यात संपवलं जीवन; प्रोबेशन पूर्ण करुन महिन्याभरापूर्वीच मिळाली होती पोस्टिंग

जागा वाटपात १२ पॅनेल एकहाती घेतल्यानंतरही शिंदे गट इथेच थांबलेला नाही. तब्बल नऊ प्रभागांमध्ये तीन-तीन उमेदवार उभे करून 'महायुती कोण चालवतो, हे सांगण्याची गरज नाही' असा सूचक संदेशच दिला आहे. भाजपनेही नऊ प्रभागांत तीन उमेदवार दिले असले, तरी एकूण आकडे मांडले, तर धनुष्यबाण ८४ जागांवर, तर कमळ केवळ ४० जागांवर मैदानात उतरले आहे. वास्तविक जागावाटपावरून अर्ज दाखल होईपर्यंत महायुतीत रोज 'सगळं ठरलंय' असे जाहीर होत होते; मात्र प्रत्यक्ष पॅनेल पाहिल्यावर ठरलेले कुणाच्या बाजूने ठरले, हे उघड झाले आहे. त्यामुळे ठाणे हा शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार हा सूचक इशारा शिंदे गट देण्यास यशस्वी झाला आहे.

Eknath Shinde
'शिवाजी पार्क'च्या सभेसाठी BMC किती भाडं आकारते? आकडा ऐकला तर बसेल धक्का

२०१७ मध्येही ३३ पॅनेलमधून १३१ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या वेळी शिवसेनेने ६७ जागांवर घवघवीत विजय मिळवत सत्ता काबीज केली, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर भाजपला फक्त १२ जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, त्या निवडणुकीतही १२ पॅनेलवर शिवसेनेचे वर्चस्व होते. आज पुन्हा उमेदवारी देताना आकडे जवळपास तसेच दिसत आहेत.

Eknath Shinde
BMC Election: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची ताकद वाढली! रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या आक्रमक पक्षाकडून पाठिंबा जाहीर

अजित पवार गटही सुसाट

महायुतीतील हे अंतर्गत गणित सुरू असतानाच, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने थेट १२ पॅनेल पूर्ण ताकदीने उतरवून 'आम्हीही मैदानात आहोत' असा इशारा दिला आहे. काँग्रेसने सहा प्रभागांत संपूर्ण पॅनेल उभे केले आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने सात पॅनेल ताब्यात घेत आपली वेगळी ओळख ठसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवसेना ठाकरे गटानेही तीन पॅनेलवर आपले चारही उमेदवार उतरवले आहेत. या निवडणुकीत सर्वाधिक आक्रमक असलेल्या मनसेला मात्र एकही पूर्ण पॅनेल निवडणूक लढण्याची संधी मिळालेली नाही.

Eknath Shinde
NCP-BJP Alliance: अजित पवारांच्या मंत्र्यानं जिरवला भाजपचा हट्टीपणा! CM फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर युतीची वाट मोकळी

मागील निवडणुकीतील वर्चस्व

  1. २०१७ला झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १२ पॅनेलवर एकहाती वर्चस्व मिळवले. या पॅनेलमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होता.

  2. राष्ट्रवादीचे सहा पॅनेल बहुमताने निवडून आले. यामध्ये बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध मनसे, एमआयएम अशी लढत होती.

  3. भाजपला मात्र केवळ तीनच पॅनेलवर समाधान मानावे लागले. येथेही भाजप विरुद्ध शिवसेना असाच सामना झाला.

  4. दोन पॅनेलमध्ये तीन सदस्य शिवसेनेचे तर एक सदस्य भाजपचा निवडून आला. तर दुसऱ्या दोन पॅनेलमध्ये तीन सदस्य भाजपचे तर एक शिवसेनेचा निवडून आला.

Eknath Shinde
Bidri Sugar Factory: जिल्हाध्यक्षांचं स्वतःच्या पक्षातील मंत्र्यांनाच तगडं आव्हान; मंत्री मुश्रीफ-पाटलांची प्रतिष्ठा पणाला

आताचा आखाडा

* शिवसेना शिंदे गटाचे पाच शिलेदार मतदानाआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गट क्रमांक ३, ६, ८, ९, १६, १७, १८, १९, २३, २४, २७, २८ या १२ प्रभागांतील चारही पॅनेलवर निवडणूक लढवत आहे. त्यापैकी प्रभाग १९ मधील तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले असून केवळ एका पॅनेलमुळे पूर्ण पॅनेल विजयाचे स्वप्न राहिले. १, ५, ७, १३, १४, २०, २२, २६, ३२ या प्रभागांमधील तीन पॅनेलवर शिवसेनेचे शिलेदार आहेत. त्यापैकी पाच प्रभागांतील अ पॅनेलवरील उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

* भाजप क्रमांक २, ११, २१ या प्रभागातील संपूर्ण पॅनेल लढवत आहे. तर ४, १०, १२, १५ या चार प्रभागांतील तीन पॅनेल भाजपसाठी सोडले आहेत.

* भाजपचा प्रभाव असलेल्या उर्वरित प्रभागांमध्येही शिवसेना शिंदे गटाने आपला उमेदवार दिला आहे.

* कळवा, मुंबा या प्रभाग समित्यांमधील प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गटाने बहुतेक संपूर्ण पॅनेलवर आपली ताकद पणाला लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com