Jalna News : जालना नगरपरिषदेचे महापालिकेत रुपांतर झाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने बुधवारी मंजूरी दिली. त्यानूसार महापालिकेत आता चार नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. ही संख्या आता 61 वरून 65 झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात जिल्ह्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. महापालिकेत पहिला महापौर आपल्याच पक्षाचा बसावा यासाठी सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे.
भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले कैलास गोरंट्याल, भाजपा नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Raosaheb Danve) भास्कर पाटील दानवे, आमदार व जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, आमदार बबनराव लोणीकर या नेत्यांना टक्करे देण्यासाठी शिवसेनेचे आमदार व उपनेते अर्जुन खोतकर मैदानात उतरले आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्ण पाठिंबा असणार आहे. महापालिका निवडणुकीत महायुती स्वतंत्र लढण्याची शक्यता लक्षात घेता जालन्यामध्ये पहिल्या महापालिकेच्या सत्तेसाठी घमासान होणार एवढे मात्र निश्चित.
शहर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाने बुधवारी मंजूरी दिली. (Jalna) त्यानंतर प्रारूप प्रभाग रचना मनपाकडून संकेतस्थळावर अपलोड केली आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यातील सत्ताधारी भाजप, शिवसेना पक्षांमध्ये पहिला महापौर ‘आमचा’च होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महापालिकेत विरोधक म्हणून एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे.
नगरपालिका असताना दहा वर्षे शिवसेना आणि दहा वर्षे काँग्रेसची इथे सत्ता होती. तर, भाजपला एकदाही जालना नगरपालिका ताब्यात घेता आली नाही. परंतु, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपमध्ये गेले. त्यामुळे महापालिका निवडणुकीत काँग्रेसला याचा फटका बसणार असून, भाजपची ताकदही वाढली आहे. भाजप पक्ष प्रवेशापासूनच माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘भाजपचा महापौर करू’ असा नारा दिला. शिवाय शिवसेनेकडून पहिला महापौर करण्याचा दावा यापूर्वीच आमदार अर्जुन खोतकर यांनी केला होता.
त्यात शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेले माजी आमदार कैलास गोरंट्याल हे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे शहर महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत महायुतीविरोधात महाविकास आघाडी अशी न होता, ‘महायुतीमधील भाजप विरुद्ध शिवसेना’ अशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या गोटात ‘महापौर आमचा होणार’ याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, शहरात पुर्वी 61 नगरसेवक होतो, हा आकडा आता 65 वर जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात मोठ्या प्रभाग एकमधून पाच नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत.
प्रभाग निहाय यादी
प्रभाग : 1
शासकीय गोदाम परिसर, हिंदनगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, दत्तनगर, सिंधी कॉलनी, गायत्रीनगर, ईदगाह, गोल्डन ज्युबिली शाळा, मनीषनगर, श्रीकृष्णनगर म्हाडा, वैभव कॉलनी, वसुंधरानगर, जिजामाता कॉलनी, ढवळेश्वर, शिक्षक कॉलनी, सकलेचानगर, संभाजीनगर, नूरशहाँ वली दर्गा, मध्यवर्ती जकात नाका.
प्रभाग : 2
विवेकानंद हॉस्पिटल, हनुमानघाट, खांडसरी लालबाग, हनुमाननगर, कन्हैयानगर, वन विभाग प्रशिक्षण केंद्र, महावितरण निवासस्थान, जवाहरबाग परिसर, अग्निशमन केंद्र, जेठमलनगर, गणपती नेत्रालय परिसर, बिहारीलालनगर, लक्ष्मीनारायण ऑइल मिल, जनता हायस्कूल, अजिंठानगर, जुनी औद्योगिक वसाहत, चंदनशिवे यांचा मळा, पॉवरलूम.
प्रभाग : 3
शकुतंलानगर, साईनाथनगर, टेलिकॉम कॉलनी, लक्ष्मीनगर, आनंद पब्लिक स्कूल, सेंट जॉन्स हायस्कूल परिसर, ३०० निवासस्थान, व्यंकटेशनगर, रामनगर पोलिस कॉलनी भाग, बुऱ्हाणनगर, कानडी वस्ती, प्रीतिसुधाजीनगर, साईनगर, मार्कंडेयनगर, ढोरपुरा, अर्जुननगर, अग्रसेननगर, जेपीसी बॅंक कॉलनी, मंठा चौफुली परिसर, खरपुडी रोड, ब्रह्मपुरी, विष्णुपुरी, सरस्वती मंदिर परिसर.
प्रभाग : 4
गोविंदसिंहनगर, भीमनगर, चमडा बाजार, लक्ष्मीमाता मंदिर परिसर, आरेफ कॉलनी, स्लॉटर हाऊस परिसर, वाल्मीकनगर, ख्रिस्ती कॅम्प, बालाजीनगर, रामनगर, मल्लाव वस्ती, गांधीनगर, रेणुकामाता मंदिर परिसर.
प्रभाग : 5
छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, कालीकुर्ती, क्रांतीनगर, मुरारीनगर, जेईएस कॉलेज परिसर, ख्रिश्चन कॉलनी, जिजाऊ प्रवेशद्वार, यादवनगर, करवानगर, सिव्हिल क्लब परिसर, आझाद मैदान परिसर, पोस्ट ऑफिस रोड, मिशन हॉस्पिटल परिसर, श्री. एम.एस. जैन विद्यालय, नारायण शाळा, रामनगर पोलिस कॉलनी भाग, नाथनगर, एसआरपीएफ परिसर, सुखशांतीनगर.
प्रभाग : 6
नळगल्ली, सराफा बाजार, पोलिस गल्ली, नंदी मंदिर परिसर, खडकपुरा, बरवार गल्ली, जिंदल मार्केट परिसर, गवळीपुरा, मोती मशीद परिसर, दाणा बाजार, फुलबाजार, भावसार गल्ली, बैदपुरा, कपडा बाजार, शनिमंदिर, शासकीय विश्रामगृह परिसर.
प्रभाग : 7
बसस्थानक, राऊतनगर, मामा चौक, महात्मा फुले मार्केट, मराठा बिल्डिंग परिसर, चरवाईपुरा, बन्सीपुरा, शोला चौक, सदर बाजार पोलिस ठाणे परिसर, संतोषवाडी, गोपालपुरा, पेन्शनपुरा, मोदीखाना, रहेमानगंज, गोपीकिशन नगर, पंचशील हॉस्पिटल, नरनारायण मंदिर, हमालपुरा, जुना मोंढा.
प्रभाग : 8
मंगळ बाजार, पाताल हनुमान मंदिर, गुडला गल्ली, लोधी मोहल्ला, मोघलाई, गैबीनाथ मंदिर परिसर, तकिया, काद्राबाद, भाजी मंडी परिसर, उतार गल्ली, कमान गल्ली, रंगार खिडकी, कुंभारगल्ली, पाणीवेस, गरीब शहा बाजार, सीटीएमके शाळा, संग्रामनगर, पोलिस कॉम्पलेक्स, लोहार मोहल्ला, महावीर चौक.
प्रभाग : 9
अष्टविनायक नगर, विठ्ठल मंदिर परिसर, जुने नगरपालिका कार्यालय परिसर, सरस्वती जीन, उढाण कॉम्पलेक्स, मस्तगड परिसर, लक्ष्मीनारायणपुरा, सिंगल जीन, डबल जीन, भालेनगरी, गणेशनगर, तुळजाभवानी नगर, सुभद्रानगर, मुळे यांचा मळा, मियासाहब दर्गा परिसर, सोनलनगर, नीलमनगर, नरिमननगर, साठेनगर, रहिमनगर, रेल्वेस्थानक परिसर एस.टी. व रेल्वे कॉलनी.
प्रभाग : 10
लक्कडकोट, कादरिया मशीद परिसर, देहडकरवाडी, कसबा, माळीपुरा, कैकाडी मोहल्ला, तिरुपती प्लाझा, पठाणगल्ली, साळीगल्ली, श्री आनंदीस्वामी गल्ली उजवी बाजू, भाजी मंडी परिसर, तडुपुरा, मोरंडी मोहल्ला, कुरेशी मोहल्ला, मोमीनगल्ली, राजवाडा परिसर.
प्रभाग : 11
श्री आनंदीस्वामी गल्ली डावी बाजू, गवळी मोहल्ला, कपूर गल्ली, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, मणियार गल्ली, दुःखीनगर, युसूफ कॉलनी, मिल्लतनगर, संजयनगर, ग्रीनपार्क, नहादी कॉलनी, नॅशनलनगर, गीतांजली कॉलनी, कृष्णबन, सोरटीनगर.
प्रभाग : 12
नवीन औद्योगिक वसाहत फेज २ व ३ भाग, चंदनझिरा, बजाजनगर, सुंदरनगर, बावलानगर, याडकीकरनगर, विठ्ठलनगर, सत्यमनगर, आयटीआय परिसर, एसटी वर्कशॉप परिसर, मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय.
प्रभाग : 13
योगेश्वरी कॉलनी, वर्धमाननगर, शंकरनगर, ठाणगे यांचा मळा, विशाल कॉर्नर परिसर, इतवारा परिसर, कुच्चरवट्टा, पायगव्हाणे कंपाउंड, बचत भवन परिसर, पोस्ट कॉलनी, तुलसी पार्क परिसर, छत्रपती संभाजी उद्यान परिसर, नवीन औद्योगिक वसाहतीचा भाग.
प्रभाग : 14
इंदिरानगर, संजोगनगर, राणानगर, श्री कॉलनी, भाग्यनगर, सराफनगर, भोईपुरा, जफरखान चाळ, विठ्ठला टॉवर परिसर, पटवी गल्ली, जैन मंदिर परिसर, वृंदावन कॉलनी, गोकुळ नगरी, मुक्तेश्वर परिसर, घायाळनगर, इन्कमटॅक्स कॉलनीचा भाग, आदित्यनगर, महिला व बाल रुग्णालय परिसर, शिवनगर, कांचननगर, ग्रामसेवक कॉलनी, समर्थनगर, विठ्ठलनगर, जिल्हा परिषदेचा मागील परिसर, जांगडानगर, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर.
प्रभाग : 15
राम मंदिर परिसर, मंमादेवी नगर, खदान परिसर, राहुल नगर, सरकारी गोदाम, गजानन मंदिर, चिंतामणी मंदिर परिसर, सहकार बॅंक कॉलनी, जमुना नगर, विद्युत कॉलनी, रमाबाई नगर, आंबेडकर नगर, नूतन वसाहत, विसावा शाळा, लहुजी चौक, ऑक्सफर्ड शाळा परिसर.
प्रभाग : 16
रेल्वे ग्राउंड परिसर, आनंदनगर, जयनगर, भक्त कॉलेज परिसर, सतकरनगर, सत्कार्यनगर, माउलीनगर, यशवंतनगर, सोरटीनगर, रूपनगर, महसूल कॉलनी, अयोध्यानगर, पांगारकरनगर, वडारवाडी, टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी, सर्व्हे क्रमांक ४८८ परिसर, आशीर्वाद नगर, योगेशनगर, भाग्योदयनगर, मातोश्री लॉन्स परिसर, श्री कॉलनी, गंगाधरवाडी, राजपूत वाडी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.