Shivsena, BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Political News : ठाकरे गटाच्या शिवसेनेचा अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपला 'धक्का'?

संपत देवगिरे

Shivsena Political News : राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे राजकीय नाते विळ्या - भोपळ्याचे झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी घेतलेले निर्णय देखील अतिशय नियोजनबद्ध असतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अधिवेशनासाठी निवडलेल्या जागेत देखील असेच एक धक्कातंत्र असल्याची चर्चा सुरु आहे.

शिवसेनेने अधिवेशनासाठी नाशिक (Nashik) शहरातील सातपूर त्र्यंबक रस्त्यावरील हॉटेल डेमोक्रॅसीची निवड केली आहे. अतिशय प्रशस्त व एकावेळी किमान 2 हजार लोक आरामात बसू शकतील अशी सभागृहाची व्यवस्था आहे. गतवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाला फोडून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्यानंतर त्यांनी जानेवारी महिन्यात याच हॉटेल डेमोक्रॅसी येथे भाजपने राज्यस्तरीय अधिवेशन घेतले होते.

त्याला गृहमंत्री अमित शहा येणार होते, मात्र ते येऊ शकले नव्हते. या अधिवेशनात भाजप (BJP) ने शिवसेने (Shivsena) ला टीकेचे लक्ष्य केले. योगायोगाने शिवसेनेने देखील नेमके हेच ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनासाठी निश्चित केले आहे. आज त्याबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, प्रवक्ते खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत, सुरज चव्हाण, संजय सामंत, वरूण सरदेसाई यांनी या ठिकाणाची पाहणी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या अधिवेशनाने स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात देखील चैतन्य आले आहे. उपनेते सुनिल बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, जयंत दिंडे, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी महापौर विनायक पांडे, महापालिकेतील गटनेते विलास शिंदे, दीपक दातीर, गणेश धात्रक यांसह विविध पदाधिकाऱ्यांशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नियोजनाबाबत चर्चा केली.

यानिमित्ताने गोल्फ कल्ब (हुतात्मा अनंत कान्हेरे) मैदानावर जाहीर सभा होणार आहे. अधिवेशन आणि सभा यामध्ये शिवसेनेचे लक्ष्य अर्थातच भाजप असणार आहे. ठिकाण ठरवून त्यांनी भाजपला पहिला धक्का दिला आहे. पुढील सर्व नियोजन अर्थातच मातोश्रीमध्ये ठरेल, मात्र यानिमित्ताने नाशिक शहर शिवसेनामय होईल यात शंका नाही.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT