Iqbal Singh Chahal Sarkarnama
मुंबई

BMC Budget 2024-25 : देशातील सर्वांत श्रीमंत मुंबई पालिकेचे बजेट 38 वर्षांनंतर प्रशासकाने मांडले

Jui Jadhav

Mumbai News : मुंबई महानगरपालिकेचे (BMC) 2024-25 या वर्षाचे बजेट शुक्रवारी (ता. 2 फेब्रुवारी) आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी सादर केले. देशातील सर्वांत श्रीमंत असणाऱ्या बीएमसीचा यंदाचा अर्थसंकल्प तब्बल 59954.75 कोटी रुपयांचा आहे. (Do you know how many crores are budget of Mumbai Corporation for 2024-25?)

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापलिकेच्या बजेटकडे उद्योगजगताचे डोळे असतात. बहुतांश कंपन्यांची प्रशासकीय कार्यालये असणाऱ्या मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प यंदा प्रशासक चहल यांनी मांडला आहे. यापूर्वी 1985 मध्ये प्रशासकाने अर्थसंकल्प मांडला होता, त्यानंतर 38 वर्षांनंतर यंदा तो मान चहल यांना मिळाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपलेला आहे. मात्र, निवडणुका न झाल्याने पालिकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या हाती आहे. त्यामुळेच आयुक्त चहल यांनी प्रशासक या नात्याने अर्थसंकल्प सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 10.50 टक्क्यांनी अधिकचा आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप दिसून येत आहे. कारण, अर्थसंकल्पाच्या पहिल्या 4 पानांवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या योजनांचा पाऊस आहे. अर्थसंकल्पात प्रथमच धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख झालेला आहे. मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी ₹507.98 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या इतरही काही प्रमुख योजनांचा त्यात समावेश आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 2024-25 या वर्षासाठी 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त चहल यांनी सादर केला आहे. गेल्या वर्षीच्या 2023-24 च्या रकमेपेक्षा यंदाचा अर्थसंकल्प 10.50 टक्क्यांनी अधिकचा आहे. गेल्या वर्षी तो 54256.07 कोटी रुपये होता.

देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबईचा अर्थसंकल्प 1985 नंतर दुसऱ्यांदा प्रशासकाने सादर केला आहे. या अर्थसंकल्पात कोस्टल रोडसाठी यंदा 2900 कोटींची तरतूद केली आहे.

विशेष प्रकल्पांसाठी तरतूद

* कोस्टल रोड प्रकल्प रु. 2900.00 कोटी

* दहिसर-भाईंदर लिंक रोड (कोस्टल रोड शेवटचा टप्पा) रु. 220.00 कोटी

* मुंबई कोस्टल रोड (उत्तर) वर्सोवा ते दहिसर 6 पॅकेज आहे रु. 1130.00 कोटी

* गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) रु. 1870.00 कोटी

* सीवरेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट (STP) रु. 4090.00 कोटी

रस्ते आणि पुलांसाठी तरतूद

* वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (WEH) आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) वर ऍक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट राबविण्याचा प्रस्ताव आहे.

* मुंबई कोस्टल रोड वर्सोवा इंटरचेंज ते दहिसर इंटरचेंज आणि GMLR बांधण्यासाठी सुमारे रु.35955.07 कोटी खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा प्रकल्प 6 पॅकेजेसमध्ये विभागला आहे. सुमारे 48 महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

* घनकचरा व्यवस्थापनासाठी ४८७८.३७ कोटी

* अग्निशमन दलासाठी ६८९.९९ कोटी

* आरोग्य खात्यासाठी १९१५.१२ कोटी

* पाणीपुरवठा प्रकल्प खात्यासाठी २४४८.४३ कोटी

Edited By- Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT