Mahayuti Government Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra politics: दोन निकाल ठरवणार राज्याच्या राजकारणाचं भविष्य : पण दोन्ही घडामोडी महाराष्ट्राच्या बाहेरच होणार!

political developments outside Maharashtra News : स्थानिकच्या निवडणूका तोंडावर असताना महायुती अथवा महाविकास आघाडीकडून या निवडणूका एकत्रित की स्वबळावर लढणार याचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सध्या जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी दोन महत्त्वपूर्ण घटना घडणार आहेत. त्याचा परीणाम येत्या काळात होत असलेल्या राज्यातील निवडणुकीवर होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दोन घटनांकडे असणार आहे. बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला लागणार आहे. त्याच दरम्यान धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना पक्ष कोणाचा या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होणार असून त्याचा निकालही चार दिवसानंतरच्या सुनावणीनंतर अपेक्षित आहे.

बिहारचा निकाल व सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा निकाल नोव्हेंबर महिन्यात लागणार आहे. त्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यानंतर खऱ्याअर्थाने स्वबळ की एकत्रित निवडणुका याचे चित्र ठरणार आहे. त्यामुळेच आतापासूनच उत्सुकता लागून राहिली आहे.

राज्यात होत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही तीन वर्षानंतर होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची व चार वर्षानंतर होत असेलल्या विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट ठरणार आहे. त्याचमुळे राज्यातील सत्ताधारी व विरोधकांनी आतापासूनच येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळेच स्थानिकच्या निवडणूका तोंडावर असताना महायुती अथवा महाविकास आघाडीकडून या निवडणूका एकत्रित की स्वबळावर लढणार याचा निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे सध्या जोरदार रस्सीखेच दिसून येत आहे.

एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांची घोषणा दिवाळीनंतर होणार हे गृहीत धरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विभागवार बैठकांचा सपाटा लावला आहे. ज्या ठिकाणी पक्षाचे बळ असेल त्याठिकाणी महायुतीतल्या घटक पक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत होईल. जिथे विरोधक प्रबळ असतील, त्या ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता महायुतीचे नेतेमंडळी कामाला लागणार आहेत.

स्थानिकची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच येत्या काळात भाजपकडे मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच येत्या काळात एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर पुढची तीन वर्षे राज्यात कुठलीही निवडणूक नाही. त्यामुळे पक्ष वाढीसाठी जे काही करायचे ते आत्ताच सर्व पक्षांना करावे लागणार आहे. त्यामुळेच महायुतीमधील तीन पक्षात जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळत आहे. भाजपने इनकमिंगचे दार उघडे ठेवले असल्याने ही भूमिका विरोधकांपेक्षा महायुतीमधील मित्रपक्षासाठी अडचणीची ठरणार आहे.

महाविकास आघाडीत ही सध्या सर्व काही आलबेल नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर बरेच काही अवलंबुन असणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत काँग्रेस लवकरच आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा होकार-नकार मविआच्या एकजुटीवर आणि ठाकरे गटाच्या जागावाटपाच्या गणितावर थेट परिणाम करणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे त्याकडे लक्ष असणार आहे.

मुंबईमध्ये सध्या उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. जे काही मिळेल ती त्यांची कमाई असणार आहे. मुंबईत एकनाथ शिंदे यांची म्हणावी तशी ताकद नाही. ठाणे, नवी मुंबईत भाजपला एकनाथ शिंदे यांची शिवसेना सोबत नकोच आहे. कल्याण- होबिवलीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद चव्हाण असल्यामुळे तेथे त्यांना स्वतःची ताकद वाढवण्याची चांगली संधी आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या सेनेला जरी महायुती म्हणून लढायचे असले, असले तरी आज भाजपची ती गरज राहिलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 227 पैकी 160 ते 175 जागा कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निर्धार भाजपने केला आहे. महायुतीचाच महापौर असेल, असे मुंबई अध्यक्ष अमित साटम सांगत असले, तरी भाजपचाच महापौर असणार आहे. शिंदेसेनेला स्वतःचे अस्तित्त मुंबईत टिकवायचे असेल, तर भाजप देईल तेवढ्या जागा घेऊन शांत बसण्यापलीकडे आज तरी त्यांच्या हातात पर्याय उरला नाही.

येत्या काळात होत असलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा यापूर्वी भाजपने केली आहे. त्यामुळेच आतापासूनच भाजपकडून रणनीती आखली जात आहे. त्यामुळे पुढील महिन्यात होत असलेला बिहार निवडणुकीचा निकाल व सुप्रीम कोर्टाचा धनुष्यबाण चिन्हाबाबत होत असलेला निर्णय यावर मविआच्या युतीचे भवितव्य व महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणाचे भविष्य अवलंबून असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT