Epstein Files: एपस्टिन फाईलमध्ये नाव अन् महिलांसोबत फोटो, अडचणीत आलेल्या बिल गेट्स यांची पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले,'मी एक गंभीर चूक...'

Epstein Files Bill Gates News: मागील काही दिवसांपासून कुख्यात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री 'एपस्टीन फाईल'शी संबंधित कागदपत्रे,फोटो आणि इतर माहिती सार्वजनिक करण्यात आल्यानंतर जगभरात मोठी खळबळ उडाली आहे.
Jeffrey Epstein Bill Gates
Jeffrey Epstein Bill Gates Sarkarnama
Published on
Updated on

Bill Gates News: मागील काही दिवसांपासून कुख्यात अमेरिकन गुन्हेगार जेफ्री 'एपस्टीन फाईल'शी संबंधित कागदपत्रे,फोटो आणि इतर माहिती सार्वजनिक करण्यात आल्यानंतर जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. या फाईल्समध्ये नाव आल्यानं जागतिक पातळीवरील राजकीय नेते, उच्च पदस्थ अधिकारी, उद्योगपती यांच्यासह अनेक बडे लोक अडचणीत सापडले आहेत. त्यात जेफ्री एपस्टाईन फाईल्समध्ये प्रसिद्ध उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचंही नाव आणि महिलांसोबतचे फोटो समोर आल्यानं जगभरात मोठा धक्का बसला होता.

जेफ्री एपस्टाईन फाईल्समध्ये नाव आणि फोटो समोर आल्यानंतर पहिल्यांदाच प्रसिद्ध उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टाउन हॉल बैठकीदरम्यान, मोठी कबुली दिली आहे. त्यात ते म्हणतात,मी एक गंभीर चूक केली आहे. एपस्टाईनसोबत वेळ घालवणे आणि फाउंडेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची ओळख करून देणे ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं त्यांनी सांगितलं.

बिल गेट्स म्हणाले, एपस्टाईन फाइल्समध्ये उल्लेख केलेल्या रशियन महिलांसोबत आपले वैयक्तिक अन् प्रेमसंबंध असल्याचेही त्यांनी मान्य केलं आहे. या नात्यांचा एपस्टाईन फाईल्समधील पीडितांशी कोणताही संबंध नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वॉल स्ट्रीट जर्नल (डब्ल्यूएसजे) ने दिलेल्या वृत्तात गेट्स यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितल्याचं म्हटलं आहे, तसेच त्यांचे रशियन महिलांशी दोन संबंध होते, ज्याबद्दल एपस्टाईनला नंतर कळल्याचंही नमूद केले. त्याचवेळी गेटस् यांनी दिवंगत फायनान्सरच्या संदर्भात "मी काहीही बेकायदेशीर केले नाही. मी काहीही बेकायदेशीर पाहिले नसल्याचा खुलासाही केला आहे.

Jeffrey Epstein Bill Gates
Dhairyasheel Mohite Patil: भाजपशी ज्यांचा टोकाचा संघर्ष, त्याच धैर्यशील मोहिते पाटलांवर दिल्लीतून मोठी जबाबदारी,राजकीय दुरावा संपणार?

बिल गेट्स यांनी त्यांच्या चॅरिटेबल फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत संबंधित कृतींची जबाबदारी घेतली. यावेळी त्यांनी दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर चर्चा केली. अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिल्याचंही सांगितलं आहे.

एपस्टाईन फाईल्समुळे जगभरातील बड्या लोकांची झोप उडाली आहे. यात बिल गेट्स यांचेही नाव समोर आले आहे. प्रसिद्ध उद्योगपती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचं नाव आणि महिलांसोबतचे फोटो जेफ्री एपस्टाईन फाईल्समुळे जगातील बडे लोक अडचणीत सापडले आहेत.

Jeffrey Epstein Bill Gates
Maharashtra BJP: भाजपच्या गोटात मोठी राजकीय घडामोड; राज्यसभेसाठी धक्कातंत्र? बीडच्या 'या' महिला नेत्याचं नाव अचानक आलं समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com