Rajasthan Election Results: मोठी बातमी: भाजप अन् केजरीवालांच्या 'आप'ची युती; सर्वात मोठा पक्ष ठरुनही काँग्रेसवर सत्तेबाहेर राहण्याची वेळ

BJP Politics : राजस्थानमध्ये 309 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांमध्ये धक्कादायक निकालांचीही नोंद पाहायला मिळाली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी भाजप, तर काही ठिकाणी काँग्रेसनंही जोरदार मुसंडी मारली.
Congress, AAP, BJP
Congress, AAP, BJPSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan News : राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.तसेच राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. सत्तेसाठी त्या त्या परिस्थितीनुसार सर्वच राजकीय पक्ष आपले विचार,तत्व, विरोध अलगद बाजूला सारत युती किंवा आघाडी म्हणून एकत्र आलेले अनेक निवडणुकांआधी आणि नंतरही पाहायला मिळाले आहेत. कट्ट्रर राजकीय विरोधक असलेले पक्षही त्याला अपवाद नाही. असाच राजकारण हादरवणारी युती राजस्थानमधील नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समोर आली आहे.

राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात पिडावा नगरपालिकेत भाजपनं सत्तेसाठी चक्क राष्ट्रीय पातळीवर कट्टर राजकीय विरोधक असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षालाच सोबत घेतलं आहे. भाजपनं पिडावा नगरपालिकेत 'आप'च्या नगरसेवकांनाच सोबत घेऊन सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवलं आहे.

आत्तापर्यंत अगदी ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत आप हा भाजपचा राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून समोर उभा ठाकल्याचं दिल्ली, पंजाबसह इतरही काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलं होतं. पण आता राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील पिडावा नगरपालिकेत भाजपनं 'आप'च्या नगरसेवकांच्या मदतीनं काँग्रेसलाच सत्तेपासून दूर ठेवलं आहे.

राजस्थानमध्ये 309 स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकांमध्ये धक्कादायक निकालांचीही नोंद पाहायला मिळाली. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी भाजप, तर काही ठिकाणी काँग्रेसनंही जोरदार मुसंडी मारली. तसेच आम आदमी पार्टीनंही या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दमदार कामगिरी करत प्रमुख राजकीय पक्षांना धोबीपछाड दिला.

Congress, AAP, BJP
Rahul Bondre Politics: राहुल गांधींच्या एका फोननंतर बोंद्रेंचा भाजपप्रवेश रद्द; काही तासांतच आमदार श्वेता महालेंचा खळबळजनक दावा

मिळालेल्या माहितीनुसार,पिडावा नगरपालिकेच्या एकूण 20 जागा आहेत.या एकूण जागांपैकी काँग्रेस 8 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर भाजपचे 6 नगरसेवक विजयी झाले होते. तसेच एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली होती. यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठण्याची संधी होती.

मात्र, भाजपनं त्याआधीच अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. त्यात भाजपनं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत चक्क त्यांचा कट्टर राजकीय विरोधक राहिलेल्या 'आप'लाच सोबत घेतलं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील भाजप उमेदवार राजू माळी यांनी आम आदमी पक्षाचे 5 नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाचा फोडत चार मतांनी विजय खेचून आणला.

Congress, AAP, BJP
8th Pay Commission: अखेर प्रतीक्षा संपली? ८ व्या वेतन आयोगाबाबत नवीन नोटिफिकेशन जारी; कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट!

राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बारा नगरपरिषदांमध्ये अरविंद केजरीवालांच्या ‘आप’नं दमदार कामगिरी करताना बहुमताच्या जवळ मुसंडी मारली आहे. तसेच शीतल राठौड यांनी थेट सभापतीपदाची निवडणूक जिंकून राजस्थानमध्ये पहिल्यांदाच एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ‘आप’ला सत्ता मिळवून दिल्याचं पाहायला मिळालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com