Cockroach Janata Party : कॉक्रोच जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा; दिवस, ठिकाण ठरले...

Pune protest, Abhijit Deepke : अभिजीत दीपके हे मुळचे महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे राज्यातील त्यांच्या पहिल्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील जंतरमंतर येथील देशातील पहिल्या आंदोलनाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हेही सहभागी झाले होते. ते शनिवारी सकाळीच अमेरिकेतून मायदेशी परतले आणि विमानतळावरूनच आंदोलनस्थळी रवाना झाले. आंदोलनादरम्यान बोलताना त्यांनी देशात अनेक ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते.

नीट, सीबीएसई परीक्षेतील अभूतपूर्व गोंधळानंतर कॉक्रोच जनता पार्टीकडून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी दिल्लीत शनिवारी पहिले आंदोलन झाले. त्यानंतर आता पार्टीचे दुसरे आंदोलन महाराष्ट्रात शैक्षणिक माहेरघर असलेल्या पुण्यात केले जाणार आहे.

कॉक्रोच जनता पार्टीकडून या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन ११ जून रोजी दुपारी चार वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. या आंदोलनातही धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दीपके यांनी भेटूया पुण्यात, असे म्हणत पार्टीच्या सदस्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

CJP Abhijeet Dipke
TMC rebellion : NDA ची ताकद वाढणार, महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा? TMC खासदारांच्या बंडामुळे असे असेल गणित...

अभिजीत दीपके हे मुळचे महाराष्ट्रातीलच आहेत. त्यामुळे राज्यातील त्यांच्या पहिल्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. दिल्लीतील आंदोलनाला ६ ते ७ हजार लोकांचा प्रतिसाद मिळाल्याची त्यांनी रविवारी सांगितले होते. आंदोलनाला गर्दी झाली नसल्याचा दावा काही जणांकडून करण्यात येत आहे. त्यालाही दीपके यांनी प्रत्युत्तर दिले होते.

CJP Abhijeet Dipke
Court verdict news : तब्बल 10 वर्षांनी आमदारकी रद्द केली, हायकोर्टाने सुप्रीम कोर्टालाच धरलं जबाबदार; नेमकं काय घडलं?

दरम्यान, दिल्लीतील आंदोलनाला काही तास आधी स्थानिक पोलिसांनी परवानगी दिली होती. पुण्यातील आंदोलनाला पोलिसांची परवानगी आहे किंवा नाही, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. कॉक्रोच जनता पार्टीकडून दिल्लीत ऐनवेळी परवानगी मागण्यात आली होती. त्यावरूनही पार्टीच्या भूमिकेवर काहींनी टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com