INDIA bloc strategy : शरद पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरूच; इंडिया आघाडातील 'या' दोन बड्या नेत्यांवर जबाबदारी

INDIA bloc strategy Delimitation Bill News : डीलिमीटेशन बिलाला पाठिंबा देण्यावरून इंडिया आघाडीतील काही पक्षात संभ्रम आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on: 
Updated on: 

New Dehli News : केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी इंडिया आघाडीच्या मित्रपक्षाची बैठक शनिवारी दुपारी पार पडली. या बैठकीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी दांडी मारली. त्यामुळे डीलिमीटेशनला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिकाही अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे इंडिया आघाडीत याबाबत चर्चा झाली. शरद पवार येत्या काळात इंडिया आघाडीपासून दूर जातील, अशी शक्यता गृहीत धरून त्यांना परत आणण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी शरद पवारांची मनधरणी करण्याची महत्त्वाची जबाबदारी दोन बड्या नेत्यावर सोपवण्यात आली आहे.

दिल्ली दरबारी गेल्या काही दिवसापासून वेगवान घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. दोन्ही बाजूनी खासदारांची जुळवाजुळव केली जात आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. डीलिमीटेशन बिलाला पाठिंबा देण्यावरून इंडिया आघाडीतील काही पक्षात संभ्रम आहे. त्यातच आता यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ही शरद पवारांची असून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न आता इंडिया आघाडीकडून केले जात आहेत.

लोकसभेचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार असून त्यामध्ये केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचं विधेयक पटलावर मांडण्यात येणार आहे. गेल्या वेळीही सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे ते होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता तीन दिवसीय अधिवेशनात पुन्हा एकदा हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे.

Sharad Pawar
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

हे विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारला संसदेतील एकूण 360 खासदारांची गरज असून त्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामध्ये डीएमकेचे 22 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे लोकसभेतील 8 खासदारांचे मत सर्वाधिक महत्त्वाची आहेत. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवारांची राष्ट्रवादी (NCP) पाठिंबा देण्याची शक्यता आहे. तशी भूमिकाही जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केली. त्यामुळेच शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता.

Sharad Pawar
Satara News: शिक्षण व्यवस्था हादरली! दहावीच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासल्या; व्हिडीओ पाहा

शरद पवार हे इंडिया आघाडीचे महत्त्वाचे घटक असल्याने त्यांच्या मताला महत्व प्राप्त झाले आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे स्वतः आजारी असल्याने रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. मात्र, त्यांच्या पक्षाच्या इतर नेत्यांनी मात्र या विधेयकाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहेत.

Sharad Pawar
Sharad Pawar NCP Delimitation : डिलिमिटेशनवरून मविआत ठिणगी! काँग्रेस-ठाकरेंना नीलेश लंकेंचा थेट इशारा; ‘बळजबरीने कोपऱ्यात ढकलू नका’

इंडिया आघाडीकडून 'या' दोन नेत्यावर जबाबदारी

मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करण्याची भूमिका इंडिया आघाडीकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीसाठी प्रत्येक खासदाराचे मत महत्त्वाचे आहे. याच कारणामुळे शरद पवारांना कोणत्याही परिस्थितीत पुन्हा इंडिया आघाडीमध्ये आणण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. त्यासाठी शरद पवारांना इंडिया आघाडीसोबत आणण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पवारांच्या मनधरणीची जबाबदारी आता उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे दोन्ही नेते आता कशा प्रकारे शरद पवारांची मनधरणी करणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.