Lok Sabha Election 2024 : ज्योतिरादित्य शिंदेंच्या मतदारसंघात 22 वर्षांनंतर पुन्हा असा योगायोग; कट्टर विरोधक मैदानात...

Jyotiraditya Scindia News : भाजपने ज्योतिरादित्य शिंदे यांना गुना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांनी 2002 मध्ये पहिल्यांदा याच मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.  
Jyotiraditya Scindia, Yadvendra Singh Yadav
Jyotiraditya Scindia, Yadvendra Singh YadavSarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील गुना लोकसभा (Lok Sabha Election 2024) मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा पराभव केला होता. त्यानंतर काही महिन्यांत शिंदेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपनेही पुन्हा शिंदेंना गुना मतदारसंघातूनच तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने शिंदेंच्या कट्टर विरोधकाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत एक आगळावेगळा योगायोग आहे.

काँग्रेसने (Congress) गुनातील प्रसिद्ध राव कुटुंबातील सदस्य असलेल्या यादवेंद्र सिंह यादव यांना तिकीट दिले आहे. शिंदे आणि राव कुटुंबातील राजकीय वैर अनेक वर्षांपासूनचे आहे. भाजपने 22 वर्षांपूर्वी यादवेंद्र यांचे वडील देशराज सिंह यादव यांना ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्याविरोधात रिंगणात उतरवले होते. 2002 मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत शिंदेंनी यादवांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

Jyotiraditya Scindia, Yadvendra Singh Yadav
Congress News : भाजपचा टॅक्स टेररिझम... प्री-पेड, पोस्ट-पेड, पोस्ट-रेड!

त्याआधी देशराज सिंह यांनी 1999 मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही यादव यांचा पराभव झाला होता. माधवराव यांनी दोन लाख मतांनी, तर ज्योतिरादित्य यांनी चार लाखांहून अधिक मतांनी यादवांचा पराभव केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आता हेच समीकरण पुन्हा पाहायला मिळणार आहे, पण या वेळी शिंदे आणि यादव यांचे पक्ष मात्र वेगळे आहेत. ज्योतिरादित्य शिंदे भाजपकडून (BJP) तर यादवेंद्र सिंह यादव काँग्रेसच्या तिकिटावर रिंगणात आहेत. शिंदे भाजपमध्ये आल्यानंतर यादवेंद्र सिंह यांनी पक्षाला राम राम ठाेकला. त्यानंतर त्यांनी 2023 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसने सिंह यांना मुंगावली विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिले होते. त्यांच्याविरोधात शिंदेंचे समर्थक राव बृजेंद्र सिंह यादव मैदानात होते. यादवेंद्र यांचा केवळ 5 हजार 422 मतांनी पराभव झाला. सध्या ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, तर पत्नी पंचायत समिती सदस्य आणि आई जिल्हा परिषद सदस्य आहे. लहान बंधू अजय प्रताप सिंह हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत.

R

Jyotiraditya Scindia, Yadvendra Singh Yadav
Rahul Gandhi News : महिलांना सरकारी नोकरीत 50 टक्के आरक्षण देणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com