Mahadev Jankar Meet Rahul Gandhi : भाजपपासून दुरावलेल्या महादेव जानकरांनी घेतली राहुल गांधींची भेट...

Maharashtra Political News : लोकसभेतील पराभवानंतर जानकर यांनी विधानसभेला महायुतीकडे विशेषतः भाजपकडे काही जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने जानकर यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तेव्हापासून ते जानकर हे भाजपासून दुरावले आहेत.
Mahadev Jankar-Rahul Gandhi
Mahadev Jankar-Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये काही जागा हव्या होत्या. मात्र, त्या न मिळाल्याने जानकर हे भाजपपासून दुरावले आहेत. भाजपपासून दुरावलेल्या जानकर यांनी आज (ता. 05 मे) काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली आहे, त्यामुळे जानकर हे काँग्रेसच्या जवळ जात असल्याचे दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना माढ्यातून उमेदवारी देण्याचे विधान केले होते. तशी त्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. मात्र, जानकर यांना परभणीतून उमेदवारी हवी होती. जानकर यांची पवारांशी सुरू असलेली चर्चा पाहून अजित पवार यांनी आपल्या कोट्यातील परभणीची जागा जानकर यांना देण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावाली होती.

महादेव जानकर यांच्या सभेसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिला सभा परभणीत घेतली होती. त्यावेळी मोदींनी जानकर यांना उद्देशून, ‘दिल्लीत मी तुमची वाट पाहतोय,’ असे म्हटले होते. मात्र, परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्याकडून जानकर यांचा पराभव झाला. लोकसभेतील पराभवानंतर जानकर यांनी विधानसभेला महायुतीकडे विशेषतः भाजपकडे काही जागांची मागणी केली होती. मात्र, भाजपने जानकर यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तेव्हापासून ते जानकर हे भाजपपासून (BJP) दुरावले आहेत.

Mahadev Jankar-Rahul Gandhi
Congress News : कोण कोणाला गिळतंय? हे आम्ही काँग्रेसमध्ये अनुभवलंय...सपकाळांना गिळल्यावर ते लक्षात येईल : काँग्रेस सोडलेल्या बड्या नेत्याचे विधान

भाजपपासून दुरावलेल्या महादेव जानकर यांच्या पक्षाने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यात गंगाखेडमधून रत्नाकर गुट्टे सोडता जानकर यांच्या पक्षाला दुसरी कोणतीही जागा मिळालेली नाही, त्यामुळे जानकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय समाज पक्षाची पुनर्बांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानकर यांनी ३१ मे रोजी नवी दिल्लीत रासपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळा आयोजित केला आहे.

Mahadev Jankar-Rahul Gandhi
Maharashtra Politic's : सदाभाऊंचा राऊतांना गावरान दणका; अजितदादांना मुख्यमंत्री करणं म्हणजे ‘येरं माझ्या मागल्या अन्‌ ताक-कण्या चांगल्या...’

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आज महादेव जानकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. त्यानिमित्ताने जानकर यांनी राहुल गांधी यांचा घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. राहुल गांधी यांच्या भेटीमुळे भाजपपासून दुरावलेले जानकर हे काँग्रेसच्या जवळ जात असल्याचे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com