Pakistan Threat to USA: अमेरिकेसाठी पाकिस्तान हा सर्वात मोठा आण्विक धोका! USA च्या गुप्तचर विभागाकडं धक्कादायक माहिती

Pakistan Threat to USA: पाकिस्तानसह इतर देशांमुळं अमेरिकेच्या सुरक्षेला थेट आव्हान निर्माण होत असल्याचंही गुप्तचर विभागाच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.
Tulsi Gabbard_USA
Tulsi Gabbard_USA
Published on
Updated on

Pakistan Threat to USA: अमेरिकेसाठी पाकिस्तान हा सर्वात मोठा आण्विक धोका असल्याची खळबळजनक माहिती अमेरिकेच्याच गुप्तचर विभागाच्या प्रमुखानं दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराणपासूनही अमेरिकेला आण्विक शस्त्रांचा धोका असल्याचं म्हटलं आहे. या देशांमुळं अमेरिकेच्या सुरक्षेला थेट आव्हान निर्माण होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Tulsi Gabbard_USA
Sushma Andhare: अशोक खरातच्या कारनाम्याची कल्पना नाही म्हणणाऱ्या चाकणकरांच्या अडचणीत वाढ! अंधारेंनी थेट जुने कागदच दाखवले

नेमका विषय काय?

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी जगाच्या सुरक्षेबाबत एक मोठा अलर्ट जाहीर केला आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की, पाकिस्तान हा त्या देशांमध्ये सामिल आहे, जे अमेरिकेसाठी सर्वाधिक अण्वस्त्र धोक्यांमध्ये गणले जातात. गबार्ड यांच्या या विधानानं आंतरराष्ट्रीय स्तरावर हालचाली वाढल्या आहेत. कारण त्यांचं हे विधान अशा वेळेस आलं आहे ज्यावेळी अमेरिका आधीच इस्रायलच्या मदतीनं इराणविरोधात लष्करी कारवाईत व्यस्त आहे.

Tulsi Gabbard_USA
'हॉर्मुज'ची रुंदी किती? जहाजं भारतात किती वेळात येतात? अंतर किती? जाणून घ्या

तुलसी गबार्ड यांनी एका मिटींगमध्ये बोलताना म्हटलं की, पाकिस्तानशिवाय रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि इराण देखील वेगानं अपले क्षेपणास्त्र व्यवस्था सक्षम करत आहे. हे देश नवे आणि अत्याधुनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहेत. जे अण्वस्त्र आणि पारंपारिक दोन्ही प्रकारची शस्त्रांची वहन क्षमता आहे. या क्षेपणास्त्रांची झेप इतकी वाढली आहे की, आता अमेरिकेचा मुख्य भूमी देखील यांच्या रेंजच्या कक्षेत येत आहेत.

Tulsi Gabbard_USA
Sambhaji Nagar ZP: भाजपनं केसानं गळा कापला! विश्वासघात केला, राज्याच्या राजकारणावर याचे परिणाम होणार; अब्दुल सत्तारांचा निर्वाणीचा इशारा

अण्वस्रांचा धोका वाढतोय?

गबार्ड यांनी पुढे म्हटलं की, या देशांच्या हालचालींवरुन वैश्विक सुरक्षेवर थेट परिणाम होतो. त्यांनी सांगितलं की, रशिया आणि चीन सातत्यानं आपली लष्करी ताकद वाढवत आहेत. तसंच उत्तर कोरिया देखील आपली आण्विक क्षमता मजबूत करत आहे. विशेष बाब ही आहे की, उत्तर कोरिया, रशिया आणि चीनसोबत आपले संबंध मजबूत करत आहेत. यामुळं अमेरिकेचा धोका वाढत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com