

Puducherry Neela Robot: पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. यावेळी पहिल्यांदाच निवडणूक आयोगानं मतदारांच्या सुविधेसाठी नीला नावाचा रोबोट तैनात केल्याचं दिसून आलं. मतदारांच्या स्वागतापासून त्यांना मतदानादरम्यान जी काही मदत हवी असेल ती मदत या नीला रोबोटद्वारे केली जात आहे. त्यामुळं हा रोबोट स्थानिकांसाठी अत्यंत आकर्षणाचा विषय ठरला आहे.
रोबोट नीला हे एक एआय फिचर्ड असिस्टंट मशिन असून पुदुच्चेरीतील काही निवडक मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आली आहेत. या रोबोटला एका स्त्रीच्या भूमिकेत सादर करण्यात आलं आहे. त्यामुळं मानवासारख्या दिसणाऱ्या या नीला रोबोटला साडी नेसून मतदारांच्या स्वागतासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळं ही नीला रोबोट हातात एक ट्रे घेऊन त्यात गुलाबाची फूलं घेऊन मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांचं ती स्वागत करताना दिसते आहे. विशेष म्हणजे या नीला रोबोटशी जर तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही तिला प्रश्नही विचारु शकता आणि त्याची ती उत्तरही देते. त्यामुळं मतदान केंद्रांवर ही नीला रोबोट मतदारांसाठी चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे.
खास म्हणजे ती मतदारांसाठी विशेष सुविधाही देत आहे. यामध्ये मतदारांशी संवाद साधणे त्यांना कुठल्या मदतीची गरज आहे का? हे विचारणं. त्यांना मतदान केंद्रावरील योग्य बुथची दिशा दाखवणं, त्याचबरोबर मतदानासंबंधी काही बेसिक माहिती पुरवणं. नीला रोबोटची नियुक्तीमागे निवडणूक आयोगाचा हेतू हाच आहे की, न थकता काम करणाऱ्या या रोबोटमुळं मतदान प्रक्रिया कमी तणावपूर्ण असेल, विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणारी व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी. म्हणजेच मतदारांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या बेसिक प्रश्नांना उत्तरं देणं आणि मतदान केंद्रावरील गोंधळ कमी करणं हे नीला रोबोटचं काम आहे.
नीला रोबोट हा केवळ सपोर्ट सिस्टिम म्हणून वापरला जात आहे, याचा निवडणूक कर्मचाऱ्यांची कपात किंवा मनुष्यबळावर कोणाताही परिणाम होणार नाही, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. पण या रोबोट व्यवस्थेमुळं हे आता दिसून आलं आहे की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नागरी अनुभव किती सुखकर, कमी खर्चिक आणि वेगवान पद्धतीनं केला जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.