

PM Modi Cabinet Expansion News : काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत राजकीय भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्रस्थान भाजप होते तर आपचे मोठे नुकसान झाले होते. खासदार राघव चड्ढांसह आम आदमी पार्टीच्या ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर आम आदमी पक्षाने राघव चढ्ढा यांना राज्यसभेतील उपनेते पदावरुन हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी हा निर्णय घेतला होता.
यामुळे राज्यसभेत १० खासदारांचे संख्या बळ असणाऱ्या आपची संख्या ३ वर आली. यानंतर त्यांना राज्यसभेत याचिका समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. दरम्यान आता त्यांना भाजप प्रवेशाचे दुसरे मोठं बक्षीस मिळणार असल्याचे वृत्त आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार राघव चड्ढा यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर चड्ढा यांच्याकडे महत्त्वाचे मंत्रालय दिले जाऊ शकते अशीही चर्चा आहे.
टीव्ही ९ मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार या (जून २०२६) महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा मंत्रिमंडळ विस्तार असणार असून कोणाला संधी मिळणार यावर देशाचे लक्ष आहे.
मात्र मंत्रिमंडळ विस्तारात चेहऱ्यांना संधी देताना आगामी होणाऱ्या विविध राज्यातील विधानसभा निवडणुका लक्षात घेतल्या जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये निवडणुका होणार असल्याने प्रदेशाध्यक्ष निवडीसह राज्य सभेच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केल्याचे दिसत आहे.
दरम्यान आता केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात उत्तर प्रदेश आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेवून चेहरे निवडले जाणार आहेत. त्यामुळे या राज्यामधील प्रतिनिधींना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या तर्कानुसार आम आदमी पक्षातून भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांचेही नाव सध्या चर्चेत आहे. या दोघांना पंजाबच्या कोट्यातून मंत्रीपदाची लॉट्री लागण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून रणनीती आखताना आखली जात असून भाजप एकहाती ताब्यात घेण्यासाठी कंबर कसण्यात आली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असणाऱ्या तरुण चुग यांच्यावर विश्वास टाकला जात आहे.
तरुण चुग हे पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील असून ते दीर्घकाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. तसेच सध्या ते भाजपचे राष्ट्रीय महासचिव असून जम्मू-काश्मीर, तेलंगणा आणि लडाख येथे भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. यामुळेच तरुण चुग यांना एखादे महत्त्वाचे मंत्रालय दिले जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.