Mayor election results: महापालिका निवडणुकीत बहुमत नसताना भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'! काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मोठा भूकंप; क्रॉस व्होटिंगने संपूर्ण गेम पलटला!

Mayor election results News : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर अजमेर आणि पाली नगरनिगमांमध्ये पाहायला मिळाला.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेल्या आठवड्यात पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात भाजपने धक्का दिला आहे. त्यानंतर राज्यातील सात महापालिकेपैकी सहा ठिकाणी भाजपचे महापौर झाले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीत सर्वात मोठा उलटफेर अजमेर आणि पाली नगरनिगमांमध्ये पाहायला मिळाला. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसकडे सर्वाधिक नगरसेवक आणि बहुमत मिळवण्यासाठी अनुकूल परिस्थिती असतानाही, काँग्रेसमध्ये झालेली फूट (क्रॉस व्होटिंग) आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपने बाजी मारली. काँग्रेसला केवळ बीकानेरमध्येच महापौर निवडून आणता आला आहे. सहा महापालिकेत भाजपने महापौर निवडून आणला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये राजस्थानमध्ये सात महानगरपालिकांसह २७३ संस्थांमध्ये महापौर आणि अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्या. अनेक ठिकाणी भाजपने विजय मिळवला. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी काँग्रेस सहज जिंकेल अशी परिस्थिती होती, तिथेही भाजपने विजय खेचून आणला. सात महानगरपालिकांपैकी काँग्रेसला फक्त एकाच ठिकाणी आपला महापौर निवडून आणता आलं आहे.

अजमेर आणि पाली येथील महापौरपदाच्या निवडणुकांमध्ये बहुमत असतानाही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. काँग्रेसला फक्त बिकानेरमध्ये महापौरपदाची जागा मिळवता आली. या ठिकाणी काँग्रेसचे अनिल कल्ला महापौर झाले. भाजपने अजमेर आणि पालीमध्ये मोठा उलटफेर केला. उदयपूर आणि अलवरमध्येही भाजपचे महापौर निवडून आले आहेत. दोन महानगरपालिकांमध्ये भाजपचे महापौर आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे, आता सातपैकी सहा महानगरपालिकांवर भाजपचे वर्चस्व आहे.

BJP and Congress
Rajasthan News: दिल्लीत रुबाब, गल्लीत पराभव! राजस्थानच्या निकालात गेहलोत-पायलटांसह शेखावतांनाही धक्का

उदयपूरमध्ये भाजपचे पारस सिंघवी महापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. भाजपचे ५३ नगरसेवक असल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित होता. अलवरमध्ये भाजपच्या सुमनलता अग्रवालही विजयी झाल्या. सुमनलता यांना ३२ मते मिळाली, तर काँग्रेसचे कमलेश शर्मा यांना २३ मते मिळाली. काँग्रेसला फक्त बिकानेरमध्ये महापौर निवडून आणता आला. बिकानेरमध्ये काँग्रेसचे ४२ नगरसेवक आहेत.

BJP and Congress
Eknath Shinde ShivSena Shocks BJP : शिंदे शिवसेनेकडून भाजपला 'धोबीपछाड', तर भाजपकडून काँग्रेसचा 'धुव्वा'; कुठे भिडले एकमेकांविरोधात!

त्यासोबतच भिलवाडा आणि भरतपूरमध्ये भाजपचे महापौर बिनविरोध निवडून आले. त्यामुळे सोमवारी पाच महानगरपालिकांमध्ये महापौरपदाच्या निवडणुका घेण्यात आल्या. अजमेर आणि पालीमध्ये सर्वात धक्कादायक निकाल लागले. अजमेरमध्ये भाजपच्या अनामिका शर्मा यांना ४३ मते मिळाली. पण भाजपकडे संख्याबळ फक्त ३२ होते. दुसरीकडे पालीच्या महापौर नमिता बुबाकिया यांना ३३ मते मिळाली. पण या ठिकाणी भाजपकडे फक्त २१ मते होती. काँग्रेस उमेदवार सुमित्रा जैन यांना फक्त ३ मते मिळाली, या ठिकाणी काँग्रेसकडे २९ नगरसेवक होते. क्रॉस व्होटिंगमुळे भाजपने दणदणीत विजय मिळवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com