Congress victory : काँग्रेसने वारं फिरवलं, भाजपचा झाला गेम, बहुमत असूनही पदरात पडला धक्कादायक पराभव ; निवडणूक निकालाची होतेय देशभरात चर्चा

Congress victory News : निवडणुकीत बहुमत असतानाही क्रॉस व्होटिंगमुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला असून काँग्रेसने शेवटच्या क्षणी मोठा गेम केला आहे.
BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Jaypur News : राजस्थानमध्ये नुकत्याच झालेल्या साठणिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपची सत्ता असताना झालेला पराभव भाजप नेतेमंडळींच्या जिव्हारी लागला आहे. या निवडणूक निकालामुळे चिंतीत असलेल्या भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत असतानाही क्रॉस व्होटिंगमुळे भाजपला पराभव स्वीकारावा लागला असून काँग्रेसने शेवटच्या क्षणी मोठा गेम केला आहे.

राजस्थानमधील ब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजपचा (BJP) क्रॉस व्होटिंगमुळे पराभव झाला, तर काँग्रेस उमेदवाराने बाजी मारली. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला, ज्यात जैसलमेरमध्ये 21 वर्षीय संतोष कुमारी यांची बिनविरोध निवड लक्षवेधी ठरली आहे. गेली काही वर्षातील पॅटर्न पहिला तर बहुमत असो वा नसो प्रत्येक निवडणुकीत भाजप बाजी मारत होता. आता मात्र, फासे उलटे पडायला लागले आहेत. भाजपला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत.

राजस्थानच्या ब्यावर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेत चेअरमन पदाच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला. बहुमत असूनही या निवडणुकीत भाजपचा नामुष्कीकारक पराभव झाला. काँग्रेसच्या (Congress) ममता गुर्जर विजयी झाल्या आहेत. क्रॉस व्होटिंग झाल्याने ममता गुर्जर विजयी झाल्या. 27 सदस्य असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपचे 14 सदस्य होते. भाजपला स्पष्ट बहुमत होते. पण बहुमत असूनही याठिकाणी क्रॉस मतदानाचा फटका भाजपला बसला असून पराभव पत्करावा लागला.

BJP and Congress
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेत्यांना नेमका काय फायदा होतो? निवडणुकीपासून सत्तेपर्यंतचं गणित

राजस्थानमध्ये 37 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होत आहेत. तीन जिल्ह्यात काँग्रेस बिनविरोध जिंकलेली आहे. दौसा, सवाई माधोपूर आणि जैसलमेरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बिनविरोध जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आहेत. जैसलमेरमध्ये 21 वर्षाची संतोष कुमारी बिनविरोध अध्यक्ष झाली.

BJP and Congress
Shivsena News : विदर्भात एकनाथ शिंदेंची ताकद वाढली : 5 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

राजधानी जयपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट सामना आहे. या ठिकाणी काँग्रेसकडे दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत आहे. मोठ्या बंदोबस्तात या ठिकाणी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. जयपूरमध्ये काँग्रेसचे यशवीर सूरा आणि भाजपचे राजेश गुर्जर एकमेकांच्या विरोधात आहेत. काँग्रेसला मात्र या निवडणुकीत विजयाची खात्री आहे.

BJP and Congress
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

21 वर्षाची जिल्हा परिषद अध्यक्ष

जैसलमेर जिल्हा परिषदेत 21 पैकी काँग्रेसचे 20 सदस्य निवडून आले आहेत. या ठिकाणी भाजपला केवळ एकच जागा मिळाली आहे. एकाच ठिकाणी भाजपच्या करुणा कंवर निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या संतोष कुमारी या अध्यक्ष झाल्या आहेत. संतोष कुमारी या अनुसूचित जमाती समुदायातून येतात. त्या 21 वर्षाच्या असून 12 पास असून अविवाहित आहेत. बिनविरोध निवडून आल्यानंतर संतोष कुमारी यांनी जैसलमेरमधील जनतेचं आणि काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.