Rahul Gandhi Notice News : 'सावरकरांचा मुद्दा' पुन्हा तापणार; राहुल गांधींना नोटीस; 1 नोव्हेंबरला सुनावणी !

Rahul Gandhi On Savarkar Issue : याचिका स्वीकारली गेल्याने राहुल गांधींच्या अडचणी वाढू शकतात.
Rahul Gandhi Notice News
Rahul Gandhi Notice News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढू शकतात कारण उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊमध्ये गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या एका तक्रारी संदर्भात याचिका जिल्हा सत्र न्यायधीश अश्विनीकुमार त्रिपाठी यांनी स्वीकारल्याने गांधी यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत. सोबतच न्यायालयाकडून राहुल गांधींना एक नोटीस पाठवण्यात आली आहे. विशेष न्यायालयात हे प्रकरण सुपूर्त करण्यात आल्याने या संदर्भात आता सुनावणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi Notice News
NCP Dhule News : `राष्ट्रवादी`मध्येच प्रामाणिक कार्यकर्त्यांना न्याय मिळेल

राहुल गांधींच्या या प्रकरणात फौजदारी स्वरूपाचा खटला रद्द केलेल्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्देशाला आव्हान देण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयात यासाठी दाद मागण्यात आली होती. आता ही याचिका स्वीकारली गेल्याने राहुल गांधींच्या अडचणी वाढू शकतात. राहुल गांधी यांच्यांसह आणखी काही जणांना नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. ही याचिका विशेष न्यायालयात सुपूर्त करण्यात आली. यावर आता एक नोव्हेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे.

Rahul Gandhi Notice News
Shirur News : भाजप लागली शिरूरमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही तयारीला : 'या' नेत्यांवर विशेष जबाबदारी

काय आहे आरोप?

याचिकाकर्ते नृपेंद्र पांडे यांनी राहुल गांधींवर काही आरोप केले होते. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते यांच्याकडून भारत जोडो या यात्रेदरम्यान विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त टीका केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ या दिवशी महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यात भाषण करताना मुद्दामहून सावरकरांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.