Sonam Wangchuk : रुग्णालयातूनच सोनम वांगचुक यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन; 'ती' चिठ्ठी आली समोर, संसदेवरील मोर्चा होणार की नाही?

Sonam Wangchuk on Parliament March : सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सफदरगंज रुग्णालयातील उपचारांवर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका करून सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे.
Sonam Wangchuk
Sonam Wangchuksarkarnama
Published on
Updated on

20 Jul Parliament March : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शनिवारी (18 जुलै) दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलन स्थळावरून बळजबरीने उचलून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यांना रूग्णालयात नेल्यानंतर अभिजीत दीपकेंनी उपोषण सुरू केलं आहे. त्यामुळे २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार होता तो पुढे ढकलला जाणार की काय? असा संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र, आता खुद्द सोनम वांगचुक यांनी पत्नी, गीतांजली आंगमो यांच्यामार्फत रुग्णालयातून आंदोलकांसाठी खास संदेश पाठवला आहे. यामध्ये त्यांनी २० जुलै रोजीचा संसदेवरील मोर्चा चांगल्या पद्धीतीने यशस्वी करण्याचं आवाहन केलं आहे. शिवाय हा मोर्चा म्हणजे भारताची दुसरी स्वातंत्र्य चळवळ असेल असंही त्यांनी पत्नीजवळ पाठवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.

पत्नीमार्फत पाठवलेल्या संदेशाचा फोटो 'कॉकरोच जनता पार्टी'च्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोतील चिठ्ठीवर सोनम वांगचुक यांच्या अक्षरात काही मजकूर लिहिल्याचं दिसत आहे. त्यांनी लिहिलं की, '२० जुलै, स्वातंत्र्याचं दुसरं आंदोलन, भय मुक्त भारत आणि अन्याय मुक्त भारत', पेपर लीकसारख्या अन्यायापासून स्वांतत्र्य आणि माझ्या बेयाकदेशीर अटकेच्या भीतापासून स्वातंत्र्य. भारताची दुसरं स्वातंत्र्य चळवळ, संसदेवर मोर्चा. कृपया हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी करा.', असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं आहे.

Sonam Wangchuk
Pune NCP : पुण्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! भाजपला टक्कर देण्यासाठी 'मास्टर प्लॅन', राष्ट्रवादीचं नेतृत्व जय पवारांकडे?

उपोषणामुळे तब्येत खालावली असतानाही वांगचुक यांनी पाठवलेल्या या संदेशामुळे आंदोलकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, वांगचुक यांच्या तब्येतीची माहिती देताना रुग्णालयाने, प्रदीर्घ उपोषणामुळे वांगचुक यांना डिहायड्रेशनची लक्षणे दिसत असल्याचं सांगितलं असून त्यांना तात्काळ वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

मात्र, वांगचुक यांच्या कुटुंबीयांनी अद्याप शिफारस केलेल्या वैद्यकीय उपचारांसाठी संमती दिलेली नाही. तर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी सफदरगंज रुग्णालयातील उपचारांवर अविश्वास दाखवला आहे. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका करून सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे.

Sonam Wangchuk
Shirur Tehsildar : मोठी बातमी! शिरुरचे तहसीलदार निलंबीत; 'तो' बेकायदेशीर निर्णय न्यायालयाकडून रद्द, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही झापलं

"वांगचुक पूर्णपणे ठीक आहेत, परंतु वारंवार विनंती करूनही रुग्णालय त्यांच्या वैद्यकीय अहवालांच्या प्रती देत ​​नाहीत, यासह आंगमो यांनी रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहून कळवले आहे की, सोनम वांगचुक यांना त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही औषध किंवा वैद्यकीय उपचार देऊ नयेत," असं सांगत त्यांनी रुग्णालयात पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत वांगचुक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com