Bishnoi Gang Threat : टायगर श्रॉफवरील हल्ल्याआधी बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते माजी आमदार; धक्कादायक माहिती समोर

Bishnoi Gang Threat: Former MLA Sanyam Lodha Also Reportedly Targeted : राजस्थान पोलिसांनी टायगर श्रॉफवरील हल्लाप्रकरणातील तीन हल्लेखोरांना ताब्यात कोटा येथून ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक हल्लेखोर अल्पवयीन आहे.
Bishnoi Gang Threat
Police have arrested three suspects in the firing at Tiger Shroff’s car in Mumbai, while reports say former Rajasthan MLA Sanyam Lodha received death threats in a separate case.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Tiger Shroff firing case latest update: बिश्नोई गँगने अभिनेता टायगर श्रॉफवर केलेल्या हल्ल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या गँगने यापूर्वीही अभिनेता सलमान खानसह अनेक राजकीय नेत्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. टायगर श्रॉफवर हल्ल्याच्या आठवडाभर आधीच या गँगने एका माजी आमदाराला धमकी दिल्याचे समोर आले आहे.

राजस्थानातील काँग्रेसचे माजी आमदार संजय लोढा यांना बिश्नोई गँगकडून धमकी फोन आला होता. याबाबत राजस्थान पोलिसांनी गु्न्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. लोढा यांच्या हत्येचे षडयंत्र समोर आल्यानंतर २० दिवसांनी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी त्यांना परदेशातील मोबाईल नंबरवरून तीन कॉल आले होते. आपण गँगस्टर आरजू बिश्नोई असल्याचे सांगत लोढा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

लोढा यांना यापूर्वीही धमकी देण्यात आली होती. त्यांच्या हत्येचे षडयंत्र उघडकीस आले होते. राजस्थान पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सनने केलेल्या तपासामध्ये हरियाणातील शूटर साहिल हा या षडयंत्राचा म्होरक्या असल्याचे समोर आले होते. त्यांनी लोढा यांच्या सिरोही जिल्ह्यातील फार्म हाऊसची रेकीही केली होती. त्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते.

Bishnoi Gang Threat
Tiger Shroff Firing Latest Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट : पोलिसांची मोठी कारवाई, सुरत एक्सप्रेसमधून 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पोलिसांनी याचदरम्यान ढोला गावातील हायवेजवळ झाडांमध्ये लपविण्यात आलेली विदेशी बनावटीची हत्यारे, बंदुकीच्या गोळ्याही जप्त केल्या होत्या. पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच बिश्नोई गँगशी संबंधित दोन शूटर्सना अटक केली होती. लोढा हे त्यांच्या निशाण्यावर असल्याचे तपासात समोर आले होते.

Bishnoi Gang Threat
Supreme Court News : निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्यास किंवा लपविल्यास मतदारही करू शकतात फौजदारी तक्रार; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

दरम्यान, राजस्थान पोलिसांनी टायगर श्रॉफवरील हल्लाप्रकरणातील तीन हल्लेखोरांना ताब्यात कोटा येथून ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक हल्लेखोर अल्पवयीन आहे. तिन्ही आरोपींना मुंबई पोलिसांकडे सोपविले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर राजस्थान पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. हे तिघे नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com