Trinamool Congress Split : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! बंडखोर आमदारांनी उचलले मोठे पाऊल, तृणमूल काँग्रेसवर ताबा मिळवण्यासाठी 'हा' मोठा गेम प्लॅन!

Kolkata, TMC headquarters News : माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दररोज धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे येथील राजकीय घडामोडीना वेग आला आहे.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

kolkatta news : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना दररोज धक्क्यावर धक्के बसत आहेत. त्यामुळे येथील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाकडून पक्षावर दावा केला जात आहे. त्यातच आता मोठी राजकीय घडामोड घडली असून बंडखोर आमदारांनी कोलकात्यातील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बंडखोर आमदारांनी तृणमूल काँग्रेसवरील दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस (Trunmul congress) पक्षात दोन गट पडल्यानंतर बंडखोर आमदारांनी कोलकात्यातील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. या कार्यालयावर ताबा मिळवताना विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासोबत फिरहाद हकीम, जावेद खान, संदीपन साहा आणि अखरुज्जमान उपस्थित होते.

Mamata Banerjee
Mamata Banerjee TMC Formation : सोनिया गांधी, सिताराम केसरी ते प्रणब मुखर्जी.. काँग्रेसमधील दिग्गजांना नडून ममतांनी 'तृणमूल'ची स्थापना केली : हायव्होल्टेज ड्राम्याची इनसाईड स्टोरी

विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यालयाचे कुलूपही बदलले आणि बाहेर लावलेले कटआउट्स हटवून नवीन कटआउट्स लावले. त्यामुळे या वेगवान घडामोडीमुळे पश्चिम बंगालमध्ये नेमके काय सुरु आहे. त्यानंतर बंडखोर गटाने यावेळी आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला आहे.

Mamata Banerjee
TMC News: माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का, बंडखोर आमदारांच्या गटानं अध्यक्षपदावरून हटवलं; 'टीएमसी' पक्षाबाबत खळबळजनक दावा

ममता बॅनर्जी (mamata banarji) यांच्या हातातून तृणमूल काँग्रेस निसटत चालली असल्याचे स्पष्ट होत आहे. पक्षाचे मुख्यालय कोलकात्यातील ईएम बायपास परिसरात आहे. मात्र, तेथे बांधकाम सुरू असल्यामुळे 2022 पासून पक्षाचे कामकाज मेट्रोपॉलिटन कार्यालयातून सुरू होते. सध्या पक्षातील नेते याच कार्यालयातून काम करत होते. मात्र, शुक्रवारी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांनी या मुख्यालयावर ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता त्यांच्या गटाचा पक्षावरील दावा आणखी बळकट झाला आहे.

Mamata Banerjee
Mamata Banerjee TMC Formation : सोनिया गांधी, सिताराम केसरी ते प्रणब मुखर्जी.. काँग्रेसमधील दिग्गजांना नडून ममतांनी 'तृणमूल'ची स्थापना केली : हायव्होल्टेज ड्राम्याची इनसाईड स्टोरी

विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी म्हणाले की, ‘या इमारतीच्या मालकांसोबत आवश्यक करार पूर्ण झाले असून, आता येथूनच पक्षाचे कामकाज चालवले जाईल आणि हेच तृणमूल काँग्रेसचे अधिकृत मुख्यालय असेल. पक्षाचे नेते अखरुज्जमान यांनीही सांगितले, ‘आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत आणि हे कार्यालयही तृणमूल काँग्रेसचेच आहे. या कार्यालयाशी पक्षाच्या भावना जोडलेल्या आहेत.’

Mamata Banerjee
Mamata Banerjee Politics: पक्ष वाचवण्यासाठी ममता बॅनर्जींसमोर दोन पर्याय? लढवय्या 'ठाकरे-पवार' पॅटर्न की काँग्रेसची मोठी ऑफर?

तृणमूल काँग्रेसमधील दोन गटात पक्ष कार्यालयावरून वाद रंगणार

दरम्यान, बंडखोर आमदारांनी तृणमूल काँग्रेसच्या मुख्यालयावर ताबा मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध केला. पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्या नेत्यांना मुख्यालयात येण्याचा कोणताही अधिकार नाही आणि त्यांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये, असे या समर्थकांनी म्हटले आहे. त्यामुळे आता येत्या काळात तृणमूल काँग्रेसमधील दोन गटात पक्ष कार्यालयावरून वाद रंगणार असल्याचे दिसत आहे.

Mamata Banerjee
Ritabrata Banerjee: बंगालमध्ये महाराष्ट्र पॅटर्न! ६० आमदारांच्या बंडखोर गटाला मान्यता, ऋतब्रता बॅनर्जी विरोधीपक्ष नेते

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com