

TVK News : तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री विजय यांनी तब्बल 144 आमदारांचा पाठिंबा मिळवत विश्वादर्शक ठराव जिंकला. विजय यांना मित्रपक्षांसह अण्णाद्रमुकमधील फुटीर 25 आमदारांच्या गटाचाही पाठिंबा मिळाला. सत्तास्थापनेपूर्वी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांच्याकडे 118 आमदारांच्या पाठिंब्याची मागणी केली होती. यासाठी त्यांना 3 वेळा लोकभवनातून परत पाठवले होते. पण राज्यपालांनी मागितलेल्या आकड्यापेक्षा विजय यांना 26 अधिक आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे.
बुधवारी (13) रोजी तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. या ठरावाच्या बाजूने टीव्हीकेच्या 108 पैकी 105 आमदारांनी मतदान केले. (मुख्यमंत्री विजय यांनी यापूर्वी तिरुचिरापल्ली पूर्व मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. तर श्रीनिवासा सेतुपती यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मतदानापासून लांब राहावे लागले. याशिवाय विधानसभा अध्यक्षांनाही अपवादात्मक स्थितीमध्ये मतदानाचा अधिकार असतो.)
तसेच काँग्रेसच्या 5, माकप 2, भाकप 2, व्हीसीके 2, आययुएमएल 2 आणि एएमएमके 1 अशा अन्य 14 आमदारांनी विजय यांना पाठिंबा जाहीर केला होता. या सर्वांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूनेच मतदान केले. तसेच अण्णाद्रमुकचे नेते सी. व्ही. षणमुगम यांच्या नेतृत्वात पक्षाच्या 25 आमदारांनी बंडखोरी केली. त्यांनी पक्षाचा व्हीप झुगारून विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला.
यावेळी विरोधी पक्ष द्रमुकने राज्यातील 65 टक्के जनतेने विजय यांच्या टीव्हीके पक्षाविरोधात मतदान केले आहे असा दावा केला. तसेच राधन पंडित या ज्योतिष्यांना मुख्यमंत्र्यांचे ओएसडी नेण्याच्या निर्णयााच निषेध केला. याच दोन्ही कारणांमुळे विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकने वॉकआऊट केले. तर 22 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केले आणि 5 जणांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.