Kolhapur Bazar Samiti Result : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती: सत्ताधारी गटास पाच तर विरोधकांना एक जागा

Kolhapur APMC : अपक्ष एक उमेदवाराचा विजय
Kolhapur Bazar Samiti
Kolhapur Bazar SamitiSarkarnama
Published on
Updated on

Congress, NCP vs BJP : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल आता हाती येऊ लागलेला आहे. जसजसे निकाल येतील त्या पद्धतीने विविध गटांचे कार्यकर्ते जल्लोष करत गुलालाची उधळण करीत आहेत. आतापर्यंत या बाजार समितीत सत्ताधाऱ्यांच्या पाच जागा निवडून आल्या आहेत. तर विरोधी गटाच्या पॅनलने आपले खाते उघडले आहे. तर अपक्ष एक उमेदवार निवडून आला आहे.

Kolhapur Bazar Samiti
Jalgaon Bazar Samiti Result : जळगावात गुलाबराव पाटलांना मोठा धक्का; देवकरांनी केला करेक्ट कार्यक्रम; आघाडीने सत्ता हिसकावली

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती (Kolhapur) निकाल एक-एक करत पुढे येत आहे. सध्या बाजार समितीसाठी सत्ताधारी आणि विरोधी गटातील एका-एका उमेदवाराची निवड झाली आहे. आडते गटातून सत्ताधारी गटातील एक उमेदवार तर विरोधी गटातून एक उमेदवार विजयी झाला आहे. यात सत्ताधारी गटाचे वैभव सवर्डेकर तर विरोधी आघडीतून मधून नंदकुमार वळंजू विजयी झाले आहेत.

Kolhapur Bazar Samiti
Karad Bazar Samiti Result: कराडच्या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण मारणार बाजी?

कोल्हापूर (Kolhapur) बाजार समितीच्या ग्रामपंचायत गटातून सुयोग वाडकर आणि शिवाजीराव पाटील विजयी झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती मधून नानासो कांबळे विजयी झाले आहेत. आर्थिक दुर्बल गटातून पांडुरंग काशीद यांच विजय झाल आहे. हे चारही उमेदवार सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना आघाडीचे उमेदवार आहेत.

Kolhapur Bazar Samiti
Bodwad Bazar Samiti Result : शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटलांना धक्का; खडसे गटाची मोठी आघाडी

कोल्हापूर बाजार समिती दृष्टीक्षेपात

एकूण जागा - 18

आतापर्यंत लागलेले निकाल - 7

सत्ताधारी गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,जनसुराज्य) - ५

विरोधी गट - (भजपा , शिंदे गट) - १

अपक्ष - १

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com