Ajit Pawar News : विधीमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.10) अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारकर बांधण्याची घोषणा अजित पवारांनी केली.
अजित पवार म्हणाले, आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते. तेथे भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येईल.
शिवरायांच्या स्फूर्तिदायी चरित्राची ओळख करून देण्यासाठी आंबेगाव येथील चार टप्प्यातील शिवसृष्टीच्या प्रकल्पात अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. पहिल्या दोन टप्प्यातील काम झाले असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले तसेच उर्वरित कामाला गती देण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी 50 कोटीचा निधी दिला जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या यांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत. त्यामध्ये कोकणातील संगमेश्वर येथे औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी अगदी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली.
छत्रपती संभाजी महाराजांचे पवित्र बलिदानस्थळ असलेल्या मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ मौजे वढु बुद्रुक येथे त्यांच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला “छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत” पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णयही शासनाने नुकताच घेतला आहे असे अजित पवार यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवारांनी छत्रपती संभाजीमहाराज की जय चा जयघोष केला.
पानिपतच्या लढाईत बलिदान देणाऱ्या मराठ्यांच्या शैर्याचे प्रतिक म्हणून हरियाणातील पानीपत येथे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचा अजित पवार यांनी जाहीर केले. तसेच स्मारकासाठी हरियाणा शासनाच्या मदतीने जागा उपलब्ध करून घेण्यात येईल, असे देखील अजित पवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.