FDA Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना पुन्हा बदलीचा धोका? बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता उतरला मैदानात; मुख्यमंत्र्यांकडे थेट संरक्षणाची मागणी

Paresh Rawal Social Media Post: भाजपचे माजी खासदार परेश रावल यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या X या प्लॅटफॉर्मवर आयएएस अधिकारी यांचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एक महत्त्वाची विनंती केली आहे.
Paresh Rawal  Tukaram Mundhe Devendra Fadnavis .jpg
Paresh Rawal Tukaram Mundhe Devendra Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी धडाकेबाज कामगिरीचा सिलसिला कायम ठेवला आहे. त्यांनी एफडीएच्या धडक कारवायांनी दणक्यावर दणके देताना भेसळखोरांसह अवैध धंदे करणाऱ्यांची अक्षरश: झोप उडवली आहे. एकीकडे त्यांच्या बेधडक कारवायांचं सर्वसामान्य नागरिकांकडून जोरदार स्वागत होत असतानाच मुंढेंच्या बदलीची धास्तीही मनात घर करुन आहे. याचदरम्यान, आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक विनंती केली आहे.

भाजपचे माजी खासदार परेश रावल यांनी सोशल मीडियावरील त्यांच्या X या प्लॅटफॉर्मवर आयएएस अधिकारी यांचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे एक महत्त्वाची विनंती केली आहे.

परेश रावल त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिशय आदरपू्र्वक आणि विनम्रतेनं एक विनंती करायची आहे. तुकाराम मुंढे यांना संरक्षण द्या, जेणेकरुन त्यांना आता ते कार्यरत असलेल्या विभागातून हटवले जाणार नाही, किंवा त्यांची बदली केली जाणार नाही. या त्यांच्या तुकाराम मुंढेंबाबतच्या पोस्टची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा असून त्यांच्या मागणीला मोठा सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. त्यांच्या कारवायांनी संबंधित विभाग वठणीवर येण्यास सुरुवात झाली की त्यांची बदली करण्यात येते असं वारंवार पाहायला मिळालं आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेत कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 वेळा बदल्या करण्यात आल्या आहेत. ते नियमांचे काटेकोर पालन, पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध सातत्यानं कठोर भूमिका घेत असतात. याचमुळे त्यांचा प्रशासकीय सेवेत मोठा वचक आहे. ते एक धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात.

Paresh Rawal  Tukaram Mundhe Devendra Fadnavis .jpg
Beed Nagarpalika : बीडमध्ये राष्ट्रवादीला झटका : 11 नगरसेवक बंडाच्या तयारीत; विजयसिंह पंडितांचे फोटो हटवले

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी मे 2026 मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्रभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची हॉटेल्स, आणि अवैध औषधांच्या विरोधात कारवायांचा मोठा धडाका लावला आहे.

तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीएच्या राज्यभरात 904 हून अधिक ठिकाणांवर छापेमारीच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात ३४ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Paresh Rawal  Tukaram Mundhe Devendra Fadnavis .jpg
Jharkhand Protest: विद्यार्थी आंदोलनाची धार तीव्र, झारखंड सरकारची मोठी कारवाई! JPSCच्या माजी अध्यक्षाला अटक अन्...

एफडीएनं मुंबई महानगरपालिका व उच्च न्यायालय परिसर,नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सरकारी-निमसरकारी कॅन्टिनवर छापेमारीत शेकडो परवाने निलंबित व कारवाई केली आहे. आता त्यांचं पुढचं टार्गेट हे चायनीज फूड असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com