Ncp News : अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस देणार अजितदादांना मोठे बक्षीस; आतापासूनच तयारी सुरू

Ajit pawar reward News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने सरकार स्थापन केले.
Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित केले. त्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने सरकार स्थापन केले. महायुतीमध्ये भाजपने 131 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या होत्या. विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीला केवळ 46 जागाच जिंकता आल्या. सुरुवातीच्या काळात महायुतीमध्ये रुसवे-फुगवे पाहण्यास मिळाले मात्र, आता तीन महिन्यानंतर महायतीचा कारभार सुरळीत सुरु आहे.

अधिवेशनाच्या काळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांचे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाव आले होते. त्यामुळे विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपामुळे मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने मोठी बातमी समोर येत आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून दोन नावे चर्चेत आहेत.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP : तगडे संख्याबळ असूनही भाजपची अत्यंत सावध पावलं; तीन आमदारांसाठी 'सिक्रेट स्ट्रॅटेजी'

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे आणि भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्यापैकी एका नावाची घोषणा होणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपद भाजपला मिळाले. राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष झाले.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
BJP MLC News : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या नेत्याची विधानपरिषदेची संधी हुकणार का ?

त्यानंतर आता विधानसभेचं उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) अजित पवार गटाला मिळणार असल्याचे समजते. विधिमंडळ कामकाजाच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाऊ शकते. यासाठी आमदार अण्णा बनसोडे आणि भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नावाची चर्चा आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar News : नितेश राणेंचं 'ते' वक्तव्य अन् अजितदादांनी इतिहासच सांगितला

बैठकीत विधान परिषदेचा उमेदवार ठरणार

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. या बैठकीला धनंजय मुंडे देखील हजर आहेत. या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या एका जागेवरील उमेदवार ठरणार आहे. त्यासोबतच इतरही काही विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar : मंत्री नितेश राणेंना अजित पवारांनी फटकारलं, म्हणाले की, ‘या देशातला मुस्लिम...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com