Congress Maharashtra : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ! 7000 पदाधिकाऱ्यांची नवी फौज येणार; 45 जिल्हाध्यक्षासह कुणाला बसणार झटका? प्रस्थापितांची धाकधूक वाढली!

Congress strategy News : महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे अपयश आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Harshwardhan Sapkal Congress
Harshwardhan Sapkal CongressSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे अपयश आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येत्या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या काळात संघटनात्मक बदल करण्याचं निर्णय त्यांनी घेतला आहे. या अंतर्गत जिल्हास्तरापर्यंत तब्बल 7000 नव्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या बदलांसाठी केवळ महाराष्ट्रासाठी विशेष परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार 45 जिल्हाध्यक्षापैकी किती जणांच्या हाती नारळ दिले जाणार याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता कुणाला झटका बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या काळात राज्यात लवकर निवडणुका नाहीत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी काम करण्याची संधी मिळावी या उद्देशाने यंत्रणा आतापासूनच कामाला लागली आहे. महाराष्ट्र क्राँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘सपकाळ पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवला जाणार आहे.

Harshwardhan Sapkal Congress
Pune Congress News: काँग्रेस राबवणार शिवसेना, राष्ट्रवादीचा फार्म्युला! पुण्याला मिळणार नवा कारभारी

राज्यातील 72 संघटनात्मक जिल्ह्यांपैकी तब्बल 45 हून अधिक जिल्हाध्यक्षांना बदलले जाण्याची शक्यता आहे. जे जिल्हाध्यक्ष गेली अनेक वर्षे एकाच पदावर आहेत किंवा ज्यांच्या कार्यकाळात पक्षाची कामगिरी खालावली आहे, त्यांना डच्चू दिला जाणार आहे. हे बदल एप्रिल अखेरपर्यंत करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक कमिटी काम कायरत आहे.

Harshwardhan Sapkal Congress
Maharashtra budget : सीएम फडणवीसांची रोजगार निर्माणबद्दल मोठी घोषणा; 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीमुळे मिळणार लाखो हातांना काम

राज्यातील केवळ जिल्हाध्यक्षच नव्हे, तर तालुकाध्यक्ष, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय (NSUI), ओबीसी सेल आणि सोशल मीडिया अशा विविध आघाड्यांवर सात हजार नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केल्या जात असलेल्या या संघटनात्मक बदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Harshwardhan Sapkal Congress
Maharashtra Politics Live Update: श्रीरामनवमी निमित्तानं पुणे शहराच्या वाहतुकीत बदल, हे प्रमुख रस्ते राहणार बंद

राज्यातील प्रत्येक जिल्हयात येत्या काळात जिल्हास्तरापर्यंत तब्बल सात हजार जणांच्या नव्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या बदलांसाठी केवळ महाराष्ट्रासाठी विशेष परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कुणाची खुर्ची जाणार अन् कुणाला संधी मिळणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Harshwardhan Sapkal Congress
Congress News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सर्वात मोठ्या फेरबदलाच्या हालचाली : 37 केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील 183 दिग्गज नेत्यांची फौज मैदानात

राज्यातील निवडणुकीला अद्याप मोठा कालावधी आहे. पण त्याआधीच काँग्रेसकडून आपली तयारी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरापासूनच काँग्रेसमध्ये बदल केले जाणार आहे. अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.

Harshwardhan Sapkal Congress
BJP News : महापालिकेत भाजपच्या वाट्याला येणार पाच स्वीकृत सदस्य, अन् 90 इच्छुकांनी घेतले अर्ज! मंत्री सावेंची डोकेदुखी पुन्हा वाढणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com