Modi-Shah meeting : दिल्लीहून परतताच भाजपकडून एकनाथ शिंदेंचा गेम; परभणी, संभाजीनगर ZP मध्ये महायुतीतून बाहेरचा रस्ता : सांगलीतही ऐनवेळी माघारीसाठी दबाव

Shiv Sena sidelined ZP elections News : शिवसेनेला परभणी, संभाजीनगर ZP मध्ये महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर सांगलीतही ऐनवेळी माघारीसाठी दबाव टाकण्यात आले असल्याचे पुढे आले आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसापूर्वी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचे पुढे आले आहे. या भेटीवेळी त्यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पाच राज्यात होत असेलल्या निवडणुकीबाबत चर्चा केली असल्याचे समजते. तर दुसरीकडे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडून रायगडमध्ये शिवसेनेला दूर सारल्याने नाराज शिंदे दिल्ली दरबारी भाजपची तक्रार करण्यासाठी गेली असल्याची चर्चा रंगली होती.

शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारासह पीएम मोदींची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत पोहचले. दुसरीकडे मात्र, मुंबईत परतल्यानंतर बुधवारी पाच जिल्हयातील झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड झाली. त्यामध्ये शिवसेनेला परभणी, संभाजीनगर ZP मध्ये महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला तर सांगलीतही ऐनवेळी माघारीसाठी दबाव टाकण्यात आले असल्याचे पुढे आले आहे.

दिल्लीहून परतलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपने मोठा धक्का दिला आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर व सांगली ZP मध्ये महायुतीमध्ये शिवसेनेला सोबत घेऊन मानाचे पान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, ऐन निवडीवेळी मात्र शिवसेनेला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे परभणी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दिल्लीत भाजप नेतेमंडळींची भेट घेऊनही दोन जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या हाताला काहीच लागले नसल्याने भेटीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Motor Vehicle Tax : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय : वाहन करात दुप्पट वाढ; 'या' वाहनधारकांच्या खिशाला कात्री

परभणी जिल्हा परिषद निवडणुकीतील संख्याबळ पाहिले तर भाजपने 24 जागांसह आघाडी घेतली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 15, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6, शिवसेना 5, काँग्रेस 3 आणि अपक्ष 1 असे चित्र आहे. या निकालानंतर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शिवसेनेसोबत युती असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवण्याचे संकेत दिले होते. भाजप (24) आणि शिवसेना (5) असा आकडा गाठत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय डाव साधत शिवसेनेला अध्यक्षपदाचे आमिष दाखवले.

त्यानुसार राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आणि अपक्ष यांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. राजकीय समीकरणे जवळपास जुळून येत असतानाच 17 मार्चच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर अचानक हालचाली झाल्या आणि पक्षाने थेट भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले.

Eknath Shinde Devendra Fadnavis
BHAVYA Scheme : मोदी सरकारकडून ‘भव्य’ योजनेची घोषणा; तब्बल 33 हजार 660 कोटींचे बजेट, तुम्हाला होणार का फायदा? वाचा सविस्तर...

छत्रपती संभाजीनगरमध्ये अध्यक्षपदावरून एकमत न झाल्याने भाजपने शेवटच्या क्षणी शिवसेनेला युतीतून बाहेरचा रस्ता दाखवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने आणि महाविकास आघाडीचे सदस्य फोडून भाजपने (BJP) याठिकाणी डाव टाकला. अपक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आणि काँग्रेसच्या एका सदस्याने भाजपला साथ दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत 23 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. एका पुरस्कृत उमेदवारासह भाजपचे संख्याबळ 24 वर पोहोचले. तर शिवसेनेचे 22 सदस्य निवडून आले. निकालानंतर महायुतीची निर्विवाद सत्ता स्थापन होणार असे चित्र असताना दोन-तीन दिवसांपासून अडीच अडीच वर्षाच्या अध्यक्षपदावरून आणि पहिल्या टर्ममध्ये अध्यक्ष कोणाचा यावरून स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र एकमत होऊ शकले नाही.

याठिकाणी बुधवारी मतदानावेळी भाजप व शिवसेनेने अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्याने जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे अविनाश गलांडे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र जैस्वाल यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदावरून एकमत न झाल्याने शेवटच्या क्षणी भाजपने शिवसेनेचा गेम केला.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Ashok Kharat Rape Case : राजकारण्यांचे भविष्य सांगणारा 'हायप्रोफाईल ज्योतिषाला' बलात्कार प्रकरणी बेड्या; 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त; मर्चंट नेव्हीच्या माजी अधिकाऱ्याचा काळा कारनामा

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहवयास मिळाली. याठिकाणी शेवटच्या क्षणी महायुतीमधील राष्टवादी काँग्रेस व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. तर दुसरीकडे सांगलीतही ऐनवेळी माघारीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव वाढविण्यात आला होता. त्याचा फायदा आघाडीला झाला आहे.

सांगलीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील विजयी झाल्या. त्यांना तब्बल 34 मते मिळाली. तर भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांना 25 मते मिळाली असून त्यांचा 9 मतांनी पराभव केला. या निकालानंतर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 सदस्यांनी महाविकास आघाडीची साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून अध्यक्षपदासाठी स्वप्नाली मासाळ यांनी तर उपाध्यक्षपदासाठी जयराज पाटील यांनी अर्ज दाखल. यानंतर अचानक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एन्ट्री झाली.

Eknath Shinde Devendra Fadnavis
RTE latest update : मोठी बातमी: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा; जाचक 'अट' अखेर रद्द; आता या तारखेपर्यंत भरू शकतात अर्ज

शिवसेनेच्या शितल बाबर यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. वाटाघाटीनंतर शिवसेनेच्या बाबर यांनी अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 पैकी 2 सदस्यही भाजपच्या बाजूने गेले. तर शिवसेनेचे दोन सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले. त्याचा महाविकास आघाडीला थेट फायदा झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 सदस्य शेवटच्या क्षणी भाजपसोबत गेले असते तरी महाविकास आघाडीचा सहज विजय झाला असता.

भाजपकडून धक्कातंत्राचा वापर

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली वारीनंतर शिवसेनेच्या वाट्याला काय आले याची जोरदार चर्चा प्रसार माध्यमामध्ये रंगली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्यात जुंपली. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही आणि अध्यक्षपदी अविनाश गलांडे यांना निवडून आणले. परभणीतही भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याऐवजी स्वतःची ताकद वापरली, ज्यामुळे शिवसेनेला सत्तेच्या खुर्चीपासून दूर राहावे लागले. सांगलीत भाजपच्या तटस्थ भूमिकेमुळे शिवसेनेचा उमेदवार अडचणीत आला. याचा अर्थ असा की, भाजपने जाणीवपूर्वक शिवसेनेला मदत करण्याचे नाकारले.१५-१६ मार्चच्या दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदेंनी सन्मानाची अपेक्षा केली होती, पण स्थानिक पातळीवर भाजपने दिलेला हा 'धक्का' महायुतीसाठी धोक्याची घंटा आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis
Rahuri Bypoll : तनपुरे 'भाजप लाइन'वर? सपकाळ-जानकरांची राहुरीत गुप्त 'फिल्डिंग'!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com