Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेच्या आदेशाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे धाबे दणाणले... एक-एक नियम वाचून दाखवत दिला कडक इशारा

Tukaram Mundhe New Orders For Hotels and Restaurant : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॅाबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती विधानसभेत दिली. यामुळे आता मुंढे यांची पुन्हा बदली होणार अशी चर्चा आहे.
Maharashtra FDA commissioner Tukaram Mundhe
Maharashtra FDA commissioner Tukaram Mundhesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यवसायिकांसाठी नवे आदेश जारी केले आहेत. या आदेशातील नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. यामुळे राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे धाबे दणाणले आहेत.

राज्यातील भेसळ मफियांसासह गुटखा मफियांचे धाबे दणाणले असतानाच तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी नवे आदेश जारी केले. तसेच या आदेशांचे पालन केले नाही तर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला.

यावेळी मुंढे म्हणाले, मी 23 जूनला एक आदेश पारित केला आहे. जो हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यासाठी असून त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. हा आदेश ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे. आमच्या विभागाने राबवलेल्या विशेष मोहीम आणि सर्वेक्षणात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ज्यात अस्वच्छता, वापरलेला खाद्य तेलाचा परत वापर, तापमान नियंत्रणात त्रुटी, दर्जाहीन साहित्याचा अन्न पदार्थाचे पॅकेजिंगसाठी वापर, यासह पिण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध नसणे. यामुळेच आता हे आदेश पारित केल्याची माहिती त्यांनी दिली.

Maharashtra FDA commissioner Tukaram Mundhe
IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली होणार? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांची सभागृहात मोठी माहिती

तसेच पारित केलेले आदेश हे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट्स, उपहारगृह, ढाबे, कँटिन, कॅफेटेरिया, बेकरी, मिठाईचे दुकानं, कॅटरिंग युनिट, फूड कॅटरस, जूस बास, विविध प्रकारचे किचनस, साखळी उपहारगृह, ई कॉमर्स आणि इतर ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांना लागू असतील, असेही तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

आदेश काय?

रेस्टॉरंट आणि हॉटेलला लायसन्स लागेल

कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि प्रशिक्षण दिलेलं असावं

स्वच्छता असायलाच हवी

आरोग्य नियमांचे काटेकोर पालन व्हावे

कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवावे लागेल

अन्नापदार्थासाठी निर्धारित तापमानाचे नियमाचे पालन करावे

Maharashtra FDA commissioner Tukaram Mundhe
Tukaram Mundhe news : तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत विधानसभेतच खळबळजनक दावा; 250 कोटी रुपयांची जुळवाजुळव...

परवानाधारक पुरवठाधारकाकडूनच कच्चा माल खरेदी करावा

पाण्याचे सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणं बंधनकारक

ग्राहकांना बाटलीबंद पाण्यासाठी सक्ती करता येणार नाही.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे वापरलेल्या खाद्य तेलाचा परत वापर करता येणार नाही.

ऑनलाइन अन्न पदार्थावर परवाना क्रमांक आणि कॅलरीची माहिती द्यावी लागेल. लागेल.

तर मोठ्या कंपन्यांनी दरवर्षी किचनचे ऑडिट करणे बंधनकारक असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com