Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतची अडचण भरत गोगावलेंनी प्रथमच सांगितली; म्हणाले, ‘त्यातून वरची नेतेमंडळी मार्ग काढताहेत’

Raigad Guardian Minister Issue : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वर्षभर वाद सुरू आहे. भरत गोगावले यांनी वरच्या पातळीवरील अडचणींचा उल्लेख करत महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले, तसेच स्वबळाची तयारीही दर्शवली.
Bharat Gogawale
Bharat Gogawale Sarkarnama
Published on
Updated on
  1. रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वर्षभरापासून संघर्ष सुरू असून, भरत गोगावले यांनी “वरच्या लेवलवरील” अडचणींमुळे निर्णय प्रलंबित असल्याचे सांगितले.

  2. गोगावले यांच्या मते तटकरे कुटुंबाकडे कोकणातील राष्ट्रवादी काँग्रेसची जागा असल्याने पालकमंत्रिपद कायम त्यांच्याकडेच जाते, तर शिवसेनेचे आठ आमदार असूनही या जिल्ह्यात त्यांना संधी मिळालेली नाही.

  3. त्यांनी पालकमंत्रिपदासाठी हक्काची मागणी केली असली तरी महायुती म्हणून निवडणुका लढवण्यास प्राधान्य देण्याचे, निधीबाबत मात्र नव्या आमदारांना प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले.

Ratnagiri, 21 September : रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा महायुती सरकार सत्तेवर येऊन एक वर्षे झाले तरी अद्याप सुटलेला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्रिपदावरून तीव्र संघर्ष सुरू आहे. शिवसेना नेते आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय अडचण आहे, यावर प्रथमच तेही आडवळणाने भाष्य केले आहे. ‘पालकमंत्रिपदासाठी वरच्या लेवलच्या नेतेमंडळींना काही अडचणी असू शकतात, त्यातून ते मार्ग काढत आहेत’ असे गोगावलेंनी म्हटले आहे.

गोगावले म्हणाले, पालकमंत्री असलो किंवा नसलो तरी आम्ही आमचे काम करीत आहोत. काम करणाऱ्याला कोणतीही अडचण येत नाही. पालकमंत्रिपदासाठी आमची इच्छाशक्ती तर प्रबळ आहेच, यात कोणतेही दुमत नाही. काही अडचणी वरच्या लेवलला नेतेमंडळींना असू शकतात, त्यातून ते मार्ग काढत आहेत. त्यामुळे नवरात्रीनंतर रायगडच्या (Raigad) पालकमंत्रिपदाबाबत मार्ग निघेल.

रायगडचे पालकमंत्रिपद कायम तटकरे कुटुंबाकडेच जात आहे. कारण, कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आदिती तटकरे याही दुसऱ्यांदा निवडून आलेल्या आहेत. नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची तटकरे यांची एकच सीट निवडून आलेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकणाच्या वाट्याला आलेले मंत्रिपद तटकरे यांच्याकडे जाते, असेही भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, दुसरीकडे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे आठ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे थोडं मागं पुढं होतं. या वेळी आम्हाला मंत्रिपद मिळालेलं आहे. आता पालकमंत्रिपद ही एकच उणीव आहे.

Bharat Gogawale
Pune ZP President : झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला एसटीने आले अन॒ लाल दिव्याच्या गाडीतून घरी गेले!

पालकमंत्रिपदासाठी आता देवीला साकडं घालतो. मी जर तिचा खरा भक्त आहे, असं देवीला वाटत असेल तर मला ती प्रसन्न होईल. पण, आम्ही काम करणारे आहोत. पालकमंत्रिपदाला आम्ही फार महत्व देतो, असं काही नाही. पण, आम्हाला हक्काने पालकमंत्रिपद मिळण्याची काही कारणं आहेत, असेही गोगावलेंनी नमूद केले.

भरत गोगावले म्हणाले, आमच्या नेतेमंडळींनी व्यवस्थित समन्वय साधला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या महायुती म्हणून लढविल्या जातील. पण, आमचीही स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी आहे. आम्हीही मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही. आम्हीही मर्द मराठ्यांचे बच्चे आहोत. पण, आम्ही पहिलं सांगतो की, महायुती म्हणून आगामी निवडणुका लढवाव्यात आणि ज्या ठिकाणी अपवाद असेल त्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवावी.

Bharat Gogawale
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जादू चालली! ठाकरे बंधूंचा पराभव! भाजपलाही धक्का!

निधीवरून भाजप आणि शिवसेनेत वाद होत आहेत, यावर भरत गोगावले यांनी हसत हसत असं काही नाही. शिवसेना आणि भाजप प्रथम एकत्र आले. एकनाथ शिंदे यांच्या काळात निधी आणि कामं प्रचंड मिळाली, त्यामुळे सध्या कमी निधी मिळत आहे, असं वाटत. पण, नुकत्याच झालेल्या बैठकीत पहिल्यांदा निवडून आलेल्या नव्या आमदारांना निधी देण्याचं ठरलं आहे. शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात पहिल्या अडीच वर्षांत हजारो कोटी रुपयांचा निधी मिळाला, त्यामुळे आम्ही संयम बाळगून नव्या आमदारांना निधीसाठी प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे गोगावले यांनी नमूद केले.

  1. प्र: रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय का लांबला आहे?
    उ: वरच्या पातळीवरील राजकीय अडचणीमुळे तो प्रलंबित आहे.

  2. प्र: तटकरे कुटुंबाकडे पालकमंत्रिपद का जाते?
    उ: कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसची एकमेव जागा तटकरे कुटुंबाची असल्याने तेथे त्यांना प्राधान्य दिले जाते.

  3. प्र: शिवसेनेची रायगडमध्ये किती आमदार आहेत?
    उ: सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये एकूण आठ आमदार आहेत.

  4. प्र: निधी वितरणावरून काय ठरले आहे?
    उ: नुकत्याच झालेल्या बैठकीत नव्या आमदारांना निधीस प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com