

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या उपसभापतींच्या निवडीच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला आहे. गेल्या अनेकदिवसापासून रिक्त असलेल्या उपसभापतिपदाची निवडणूक विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सोमवारी जाहीर केली. त्यांनी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता बुधवारी 1 जुलैला दुपारी एका वाजता निवडणूक होणार असल्याचे सभापती शिंदे यांनी जाहीर केले.
विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा आमदारकीचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आला. त्यानंतर उपसभापतिपदाची निवडणूक कधी होणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली होती. त्यानुसार सभापतीनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 30 जून रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशन अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता अर्जांची छाननी होईल. आवश्यक असल्यास माघारीनंतर 1 जुलै रोजी मतदान होणार असून, बिनविरोध निवड झाल्यास त्याच दिवशी उपसभापतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
विधान परिषद नियम सात अन्वये सभापती निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जाची छाननी, माघार आणि प्रत्यक्ष मतदान अथवा बिनविरोध निवडीची प्रक्रिया निश्चित होणार आहे. त्यानुसार आता बुधवारी १ जुलैला दुपारी एका वाजता निवडणूक होणार असल्याचे सभापती शिंदे यांनी जाहीर केले.
विधान परिषदेत महायुतीकडे (Mahayuti) स्पष्ट संख्याबळ असल्याने उपसभापतिपदावर सत्ताधारी पक्षाचाच उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे महायुतीतील विविध घटक पक्षांकडून या पदासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.
महायुतीकडून हे पद एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी या पदासाठी सेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र, या पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अचानक दुसरे नाव पुढे येऊ शकते. या पदासाठी सध्या माजी मंत्री बच्चू कडू यांचे नाव चर्चेत आहे. त्याशिवाय कृपाल तुमाने, चंद्रकांत रघुवंशी, आणि मनीषा कायंदे यांचीही नावे पुढे आली आहेत. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत उत्सुकता कायम राहणार आहे. त्यामुळे या दोघापैकी कोणाचे नाव फायनल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.