Shivsena Politics : रवींद्र धंगेकर, नाना भानगिरे अडचणीत! संतप्त 200 कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंकडे धाव

Ravindra Dhangekar Nana Bhangire Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी पुण्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर आणि नाना भनगिरेंच्या बद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे.
Ravindra Dhangekar Nana Bhangire
Ravindra Dhangekar Nana BhangireSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिका निवडणुकांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुण्यामधून मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे शिवसेनेचे महानगर प्रमुख असलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलाला पराभवाचा सामना करावा लागला तर दुसरीकडे शहर प्रमुख असलेल्या नाना भानगिरे यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.

महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने तब्बल 122 जागा लढवल्या आणि एकाही जागेवर त्यांना यश मिळवता आलं नाही. इतक्या मोठ्या दारुण पराभवानंतर संघटनात्मक मोठ्या प्रमाणात बदल होतील अशी चर्चा होती.

मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी पुण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये पुण्यातील शहर कार्यकारणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ही शहर कार्यकारणी बरखास्त करत असताना शहर प्रमुख आणि महानगर प्रमुख यांची पद कायम ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहर कार्यकारिणीतील प्रमुख पदे वगळता इतर सर्व पदे बरखास्त करण्यात आली असून, प्रभारी नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. येत्या एक महिन्यात पुणे शहरातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ‘जुनी खोड’ बाजूला सारत किती नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ravindra Dhangekar Nana Bhangire
Baramati By Election : सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन पण जय पवारांचा वेगळाच प्लॅन, बारामतीच्या राजकारणात ट्विस्ट!

मात्र या निर्णयानंतर पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीमध्ये पक्षाची ध्येय धोरण ज्यांनी ठरवली ज्यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवल्या गेल्या. ज्यांच्या अट्टहासामुळे युतीमध्ये निवडणुका न लढता स्वबळावर निवडणुका लढवल्या गेल्या, त्यांना या पराभवाला जबाबदार धरून त्यांचे राजीनामे घेणे आवश्यक असताना त्यांना पदावर कायम ठेवून इतर कार्यकारणी बरखास्त करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

उद्या होणार फैसला

शहरातील तब्बल 200 कार्यकर्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी ठाण्याला जाणार आहेत. रविवारी उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत वेळ दिली असून पुण्यातील हे कार्यकर्ते शिंदे यांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडणार आहेत. या नंतर पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर आणि शहर प्रमुख असलेल्या नाना भानगिरे यांना देखील पद सोडावी लागणार का ?हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ravindra Dhangekar Nana Bhangire
Eknath Shinde strategy: राज्यसभा हुकलेल्या नेत्याला आता थेट केंद्रात मोठी जबाबदारी? एकनाथ शिंदेंच्या आश्वसनांनंतर नाराजी दूर होणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com