Sangli Politics : पाठपुरावा सुहास बाबरांचा अन् उद्घाटनाला बोलावलं पडळकरांना : आटपाडी सबस्टेशनचा वाद थेट विधानसभेत, महावितरणचे अधिकारी अडचणीत

Atpadi substation inauguration controversy : आटपाडी तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा करून दिघंची, शेटफळे आणि हिवतड येथे नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर करून आणले होते. त्यासाठी त्यांनी पाठपुरवठा आणि प्रयत्न केले होते.
MLA Suhas Babar, Gopichand Padalkar
MLA Suhas Babar strongly reacts during Assembly session over substation inauguration dispute, highlighting protocol violation issue.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 25 Mar : आटपाडी तालुक्यातील दिघंची-शेटफळे येथे आमदार बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सबस्टेशनचे उद्घाटन स्थानिक आमदारांना डावलून केल्याने खानापूर-आटपाडी मतदारसंघातील आमदार सुहार बाबर चांगलेच भडकले आहेत.

लोकप्रतिनिधींच्या हक्कावर गदा आणणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभेत आमदार बाबर यांनी सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

आटपाडी तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी आमदार सुहास बाबर यांनी पाठपुरावा करून दिघंची, शेटफळे आणि हिवतड येथे नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) मंजूर करून आणले होते. त्यासाठी त्यांनी पाठपुरवठा आणि प्रयत्न केले होते. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कोणतीही कल्पना न देता या कामाचा लोकार्पण सोहळा भाजप नेत्या नीता केळकर आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उरकला.

MLA Suhas Babar, Gopichand Padalkar
Ashok Kharat Case: भोंदूबाबा खरातचं नाव 'अशोक' नव्हेच समोर आली धक्कादायक माहिती; स्वत:च्या नावातही झोल...

आपल्याच मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमात स्थानिक आमदाराला अशा प्रकारे डावलले गेल्याबद्दल आमदार सुहास बाबर यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. "शासकीय कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींना योग्य स्थान मिळणे हा त्यांचा अधिकार आहे, मात्र अधिकाऱ्यांनी जानेपूर्वक राजकारण करून प्रोटोकॉलचे उल्लंघन केले आहे," अशी भूमिका मांडली.

विटा विभागीय कार्यालयाचे अधिकारी आटपाडी कार्यालयाचे अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांनी याचे आयोजन केले होते. कसलीही कल्पना न देता दुसऱ्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या हस्ते उद्घाटन केल्याबद्दल नाराजी व्यक्त केले.

MLA Suhas Babar, Gopichand Padalkar
Sanjay Raut : "भोंदूबाबा अशोक खरात हा भाजपचा अधिकृत प्रचारक होता..."

मतदारसंघाच्या विकासासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या आमदाराचा हा अपमान असल्याची भावना व्यक्त करत विशेषाधिकार भंगाची सूचना सादर केली. आमदार सुहास बाबर यांच्या मागणीची दखल घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या निर्णयामुळे प्रोटोकॉल धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Edited By Jagdish Patil

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com