Beed Lok Sabha 2024 : बजरंग सोनवणेंना नोटीस तर पंकजा मुंडेंना सूचना, निवडणूक खर्चात तफावत...

Bajrang Sonwane : खर्च मान्य करूनही तशी नोंद आपल्या निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये का घेतली नाही ? याबाबत लेखी खुलासा तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला होता.
Pankaja Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Bajrang SonwaneSarkarnama
Published on
Updated on

Beed Lok Sabha : बीड लोकसभेची निवडणूक चौथ्या टप्प्यात झाली. महाविकास आघाडीचे बजरंग सोनावणे आणि महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यात कोण बाजी मारणार याची राज्यभर चर्चा आहे. काही तालुक्यात वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला फायद्याचा आणि कोणाला तोट्याचा याचे गणित मांडले जात आहे.

मात्र,निवडणूकीच्या काळात प्रचारासाठी सादर केलेल्या खर्चामध्ये तफावत आढळून आल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ यांनी नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे Pankaja munde यांना खर्चाचे रेकाॅर्ड (अभिलेख) सादर करून तपासणी करून घ्यावीत व खर्चात तफावत राहणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. तसे आदेश देखील दीपा मुधोळ यांनी काढले आहेत.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
P N Patil Passes Away : काँग्रेस निष्ठावंत आमदाराला पोरकी झाली, करवीरवासियांचा पांडुरंग हरपला

बीड लोकसभा Beed Lok Sabha मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या रेकाॅर्डची तिसरी तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांताकुमार बिस्वास यांनी 12 मे रोजी केली होती. या तपासणीमध्ये बजरंग सोनवणे Bajrang Sonwane यांनी 7 ते 10 मे या कालावधीतील खर्च सादर केला. पहिल्या व दुसऱ्या खर्चातील तफावत अनुक्रमे 5 लाख 31 हजार 294 व 4 लाख 27 हजार अशी एकुण 9 लाख 59 हजार 231 ऐवढी तफावत मान्य केली.

मात्र सदरील रक्कम नोंदवहीमध्ये समाविष्ट करून तशी नोंद घेणे आवश्यक असताना ती नोंद घेतली नाही. त्यामुळे 22 एप्रिल ते 10 मे या कालावधीतील खर्चामध्ये छायांकित निरीक्षण नोंदवहीशी तुलना करताना 9 लाख 59 हजार 231 एवढी तफावत आढळून आली आहे.

खर्च मान्य करूनही तशी नोंद आपल्या निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये का घेतली नाही ? याबाबत लेखी खुलासा तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला होता. तसेच तफावत रक्कम निवडणूक खर्चात समाविष्ट करून तपासणीकरिता सादर करण्याची सूचना सोनवणे यांना दिली होती. मात्र सोनवणे यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक नव्हता.

मान्य केलेली तफावतीची एकूण 9 लाख 59 हजार 231 रक्कम निवडणूक खर्च नोंदवहीमध्ये समाविष्ट करावी व ही नोंदवही तपासणीसाठी सादर करून तपासणी करून घ्यावी. तफावत राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अन्यथा निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवण्यात कसूर केल्याचे गृहीत धरून कारवाई करण्याची सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सोनवणे यांना दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

12 मे रोजी तिसऱ्या खर्च तपासणीत 6 ते 10 मे या कालावधीतील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी सादर केलेल्या खर्चाची तपासणी करण्यात आली. या कालावधीत 16 लाख 66 हजार 431 एवढ्या रकमेची तफावत दिसून आली. तर 3 मे 10 मे या कालावधीत एकूण 20 लाख 94 हजार 40 एवढ्या रकमेची तफावत आढळून आल्याने मुंडे यांना नोटीस बजावली होती.

नोटिसीमध्ये दर्शविलेल्या रकमेची तफावत पंकजा मुंडे यांनी मान्य केली. ही रक्कम खर्चात समाविष्ट करुन निवडणूक खर्च नोंदवही तपासणीसाठी सादर करून तपासणी करून घ्यावी, असेही म्हटले आहे. दैनंदिन हिशोब नोंदवही अभिलेखे अचूक व नियमितरीत्या सादर करावी, त्यात तफावत राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पंकजा मुंडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली आहे.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Arvind Kejariwal Statement: स्वाती मालीवाल मारहाण आरोप प्रकरणावर मुख्यमंत्री केजरीवाल पहिल्यांदाच बोलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com